
नांदेड। हिंदू धर्मियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचे असलेल्या अयोध्या येथील राममंदिराच्या बांधकामाला भेट देत उत्तर भारत यात्रा सुरक्षित पूर्ण करून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या ८५ यात्रेकरूंचे शनिवारी पहाटे नांदेड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले.

नऊ दिवसात या जत्थ्याने काशी, मथुरा, अयोध्या, प्रयाग, आग्रा, वृंदावन, सारनाथ, सीतामढी या प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.कोरोना मुळे दोन वर्ष खंड पडल्यानंतर या वेळेस मोठ्या उत्साहात ही यात्रा सुरु झाली.दिलीप ठाकूर यांच्या समवेत नांदेडसह मुंबई, पुणे,सातारा, सोलापूर, संभाजीनगर, परभणी,हिंगोली,लातूर व निझामबाद येथील ७४ यात्रेकरू व ४ टूर मॅनेजर आणि ७ कॅटरिंग टीमचे सदस्य सहभागी झाले होते.सुरुवातीला आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल आणि आग्रा किल्ल्याला भेट दिली. मथुरेला श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वृंदावनच्या बांकेबिहारीचे प्रचंड गर्दीत दर्शन घेतले.मथुरा ते अयोध्या रेल्वे प्रवासादरम्यान लखनौ ते अयोध्या लाईन ब्लॉक असल्यामुळे आकस्मित अडचण निर्माण झाली होती. परंतु तातडीने बसेसची व्यवस्था करण्यात मॅनेजमेंट टीमला यश आले. यात्रेकरुंनी अयोध्या येथे शरयु नदीत पवित्र स्नान करून श्रीरामलल्लाचे दर्शन केले. पुढील वर्षी पूर्णत्वास येणाऱ्या भव्य राम मंदिराचे बांधकाम २४ तास सुरू असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.

भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी वाराणसी कॅरोडार तयार केल्यामुळे अतिशय प्रेक्षणीय झालेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी काशी विश्वेश्वर मंदिराचे गंगा स्नानानंतर दोनदा दर्शन घेतले. काही यात्रेकरूंनी पिंडदान केले.स्पीड बोटद्वारे बनारस येथील गंगातिरी असलेल्या सर्व घाटांना भेटी दिल्या. सायंकाळच्या जगप्रसिद्ध गंगा आरती मध्ये सर्वजण सहभागी झाले. बौद्ध धर्मात अतिशय महत्व असलेल्या सारनाथला भेट दिली.

तालिबान्यांनी अफगाणिस्तान मध्ये उध्वस्त केलेल्या बौद्ध मूर्तीची हुबेहूब भव्य प्रतीकृती या ठिकाणी पाहण्यास मिळाली. सीतामैया ज्या ठिकाणी धरतीमध्ये सामावून गेली ते सीतामढीचे मंदिर पाहिले. प्रयागराज येथील गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर छोट्या छोट्या होडीने जावून स्नान केले.महिलांनी वेणी दान केले. वातानुकूलीत तृतीय वर्गाचा रेल्वे प्रवास, प्रशस्त दोन बसेस आणि राहण्यासाठी उत्तम हॉटेलच्या सुसज्ज रूम मध्ये यात्रेकरूंची व्यवस्था करण्यात आली होती.

दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी घेतलेले मनोरंजक खेळ, अंताक्षरी,प्रत्येक प्रवाश्यांवर केलेले मार्मिक विनोद यामुळे प्रवासाची रंगत वाढली.ठाणे येथील कॅटरिंग टीमने रुचकर महाराष्ट्रीयन भोजन वेळेवर दिल्यामुळे बहुतेक जण जेष्ठ नागरिक असून देखील सर्वांची प्रकृती चांगली राहिली.संदीप मैंद, किरण मोरे यांनी योग्य नियोजन केले. प्रवासादरम्यान टूर मॅनेजर मिलिंद जलतारे , संजय राठोड, लक्ष्मीकांत जोगदंडे यांनी सर्वांची वैयक्तिक काळजी घेतली.

भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने नऊ मार्चला नेपाळ, सत्तावीस मार्चला रामेश्वर कन्याकुमारी,पाच एप्रिलला हिमाचल प्रदेश येथे रेल्वेने जाणाऱ्या यात्रा हाऊसफुल झाल्या आहेत.२४ एप्रिल ला गुजरातला जाणाऱ्या टूरच्या काही जागाच शिल्लक असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली.आकस्मिक परिस्थितीत देखील दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने अंत्यत नियोजनबद्ध व्यवस्था केल्याबद्दल सर्व यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केले.

