
नायगाव, रामप्रसाद चन्नावार| वसुंधरारत्न राष्ट्रसंत प.पू.डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची १०७ वी जयंती टेंभूर्णी ता .नायगांव येथे दि.२५ फेब्रुवारी रोजी महाआरती ,भस्म,गुलाल, पुष्पवृष्टी करुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवातीला वसुंधरारत्न राष्ट्रसंत प.पू.डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करून महाआरती राजेश्वर मंगनाळे व शिवाजीराव पन्नासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक शिवाजीराव पन्नासे, किर्तनकार सौ.स्वातीताई माधवराव तंगशेट्टे,शिवकथाकार संगमेश्वर महाराज वलांडीकर, रामदास वसमते, बसवेश्वर महाराज मंडगी, विलास मरखेले, संतोष कुरुडगीकर, सरपंच प्रतिनिधी सुगंधराव पाटील वडजे, माजी चेअरमन राजेश्वर मंगनाळे, , बाबुराव पाटील वडजे, दिगंबर गुरुजी वडजे, निळकंठराव गोरे, बालाजी पैनापल्ले, जगदिश गोरे, बालाजी गीरी, नारायण भास्करे, बालाजी गोरे, आनंदराव वडजे, भास्करराव वडजे, मारोती भास्करे,राजेश भास्करे, कैलास पांचाळ, देविदास वडजे, भगवान वडजे,व्यंकटी ईबितदार, माधवराव कळसे सह आदींची उपस्थिती होती.

