
अर्धापूर, निळकंठ मदने। नांदेड – अर्धापूर महामार्गावरील दाभड शिवारातील बाबा पेट्रोल पंपाजवळ व कारने दुभाजक फोडून आयचरला समोरासमोर जबर धडक दिली, आयचरच्या पाठिमागे येणाऱ्या दुसऱ्या कारची आयचरला धडक दिल्याने आयचर व ही कार रस्त्यालगत फेकल्या गेला,तर तिन वाहनांच्या विचित्र अपघातात मंगळवारच्या सकाळी १२:३० वा.झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर ५ जण जखमी आहेत,जखमीवर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नांदेड-अर्धापूर महामार्ग क्र.३६१ वर रस्त्याचे काम जागोजागी सुरु आहे,या रस्त्यावरील दाभड शिवारातील बाबा पेट्रोल पंपाजवळ आयचर क्र.एम एच १३ सी यु ४६४४ ला समोरुन येणाऱ्या कार क्र.एम एच ३७ जी ९८८९ दुभाजका फोडून उलट दिशेने समोरुन येणाऱ्या आयचरला जबर धडक दिली,तर यावेळी आयचरच्या चालकांने समोरुन दुभाजकावरुन कार ऊलट दिशेने येत असल्याचे पाहून डाव्या बाजूला आयचर घेतले.

त्यातच पाठीमागून येणाऱ्या कार क्रि.एम एच २३ ए डी ने आयचरला पाठीमागून धडक दिली,आयचरमध्ये झोपेत असलेल्या क्लीनर आयचर मधून बाहेर फेकल्या गेला व पाठीमागची कार क्लीननरच्या शरीरावर आदळली, ही दोन्ही वाहने रस्त्यालगत गेली,रात्रीची १२:३० ची वेळ,सर्वत्र थंडी होती,अपघातसमयी मोठा आवाज आला,वाहनातील प्रवाशांनी आरडाओरडा केला,एकच आकांत परीसरात झाला, साडेतीन किलोमीटर अंतरावरील वसमत फाटा येथील महामार्गाचे पोलिस व सात किलोमीटर अंतरावरील अर्धापूरच्या पोलीसांनी व सभोवतालच्या काही गावकऱ्यांनी मदतकार्यास विनाविलंब सुरुवात केली.

जखमींना वाहनातून बाहेर काढून पुढील उपचारासाठी नांदेडला महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून पाठविले, काहीकाळ वाहतूक ठप्प होती,अत्यंत दुदैर्वी घटना घडल्याने उपस्थितांमध्ये स्मशान दुखवटा पसरला,पहाटे चार पोलीसांचे मदतकार्य सुरू होते.यावेळी यामध्ये क्लीनर रामा प्रल्हाद डोंगरे वय (५०) रा.इंचगाव ता.मुहोळ,जि. सोलापूर,अमित विठ्ठल घुगे वय(२९) रा तरोडा यांचा जागीच मृत्यू झाला.तर स्वप्निल शिवाजी पाटील हे गंभीर जखमी आहेत. साईनाथ मुळे रा.नाईकनगर नांदेड, अभिजीत शिरफुले,जावेद सय्यद अहमद,सय्यद अयान,नाहीद बेगम,नजमा बेगम सर्व रा बरकतपुरा माळटेकडी नांदेड यांचा जखमींमध्ये समावेश आहे.

घटनास्थळी महामार्गाचे अविनाश चव्हाण,उपनिरीक्षक कपील आगलावे, रमाकांत शिंदे शेणीकर,कोकाटे, महेंद्र डांगे, कल्याण पांडे,संजय घोरपडे, संदीप गायकवाड,इर्शाद बेग, राजकुमार व्यवहारे,जसप्रीतसींह शाहू, संदिप चटलेवार,वसंत शिनगारे या पोलिस कर्मचाऱ्यांनी सकाळी उशीरापर्यंत मदत कार्य केले,या घटनेमुळे हिवराफाटा येथे झालेल्या रुग्णवाहिकेच्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना डोळ्यासमोर येत आहे,वाहनांनी वेग मर्यादा ओलांडल्याने हे अपघात होत आहेत.याकडे सबंधीतांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

