
हिमायतनगर, अनिल मादसवार| रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराने हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतीत अनाधिकृतपणे खोदकाम करून गौण खनिज चोरून नेऊन शेतीचे नुकसान केले आहे. या संदर्भाची चौकशी करून कार्यवाही व्हावी आणि नुकसान भरून द्यावे अशी मागणी करूनही प्रशासन व ठेकदाराकडून टाळाटाळ चालविली जात आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी दि.०१ मार्चपासून सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड व तहसीलदार हिमायतनगर याना दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अर्धापूर फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदाराकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. हे काम करताना ठेकेदाराने अभियंत्याला हाताशी धरून थातुर माथूर काम केल्याने उदघाटनापूर्वीच अनेक ठिकाणी रास्ता खचून मोठं मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच रस्त्याचे काम करताना आत्तापर्यटन २ ते ३ जणांचा बळी गेला आहे. असे असताना देखील रस्ता काम करताना मोती अनियमितता केली जात असून, स्थानिक महसूलच्या काही लोकांना हाताशी धरून मनमानी पद्धतीने कोणाच्या जमिनीत खोदकाम करून गौण खनिज काढून पर्यावरणाला बाधा पोचविता शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. असाच एक प्रकार हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात करून मोठे नुकसान केले आहे.

दिलेल्या निवेदनात हिमायतनगर तालुक्यातील मौजे विरसनी येथील शेतकरी वसंतराव किशनराव कानवटे यांची म्हंटले कि, गट क्रमांक ६/१ मध्ये २० गुंठे शेती आहे. या शेतजमीच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने मला कोणती विचारपूस न करता रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने बळजबरीने रात्रीतून विरसणी सज्जा अंतर्गत असलेल्या शेत सर्वे नंबर मधील क्षेत्रफळ पैकी झिरो हेक्टर जमिनीवर मोठा खड्डा करून जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करत मोठ्या प्रमाणावर गौण खनिज मुरूम उत्खनन करून चोरी केली आहे. त्यामुळे माझ्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सदरील प्रकरणा संदर्भात तहसीलदार हिमायतनगर यांना अनेक वेळा संबंधित कन्स्ट्रक्शन वर कार्यवाही करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली.

सदरील प्रकरणी सात वेळा हेरिंग झाली आहे. मंडळ अधिकारी यांनी जायमुख्याने येऊन पंचनामा सुद्धा केलेला आहे. तसेच आजूबाजूच्या चार शेतकऱ्यांच्या जबाब सुद्धा रुद्राणी कन्स्ट्रक्शनने शेतकऱ्याच्या शेतातून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी त्यांचे जबाब लेखी दिलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत तहसीलदार महोदयानी कोणत्याही प्रकारची संबंधित रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या ठेकेदारावर कार्यवाही न करता यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्हाला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. तरी मेहरबान साहेबांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनीने माझ्या शेतात अनधिकृतपणे उत्खनन करून गौण खनिज नेल्याप्रकरणाची कार्यवाही करावी. शेतजमिनीत करण्यात आलेल्या मोठा खड्डा पूर्णपणे बुजून माझ्या शेतीचे झालेले नुकसान भरपाई आठ दिवसात करून देण्यात यावी. अशी मागणी दि.१५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देऊन केली.

अन्यथा मी सहकुटुंब लोकशाही मार्गाने मुलगी अर्चना राजू साळवे हिच्यासोबत मौजे विरसनी येथील गट क्रमांक ६/१ मध्ये दि.०१ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे म्हंटले आहे. या दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे सर्वस्वी जबाबदारी ही रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी व शासन प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव, पोलीस निरीक्षक हिमायतनगर, यांना दिल्या असून, यावर वसंतराव किसनराव कानवटे राहणार विरसणी, अर्चना राजू सावळे राहणार डोंगरकरा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांची स्वाक्षरी आहे.

याबाबत श्री कानवटे म्हणाले कि, हा प्रकार झाल्याचे समजताच मी तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला. त्यानंतर पंचनामे होऊन आजूबाजूच्या लोकांची जबाब देखील घेण्यात आले. मात्र अद्यापही नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबासह मी दिनांक ०१ मार्चपासून आमरण उपोषण करणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार हिमायतनगर जिल्हाधिकारी नांदेड यांना देऊ केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीस बोलतांना सांगितले आहे.
