नवीन नांदेड| दिनांक 22 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून अशोकराव चव्हाण यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले. असे खुद्द माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी कारेगाव फाटा ता. धर्माबाद येथील कृतज्ञता सोहळ्यात भर सभेला संबोधित करताना अशोकराव चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या. माझ्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून. त्या लेटर पॅड मधील मजकूर आक्षेपार्ह असल्याकारणाने माझी बदनामी करण्याचं षडयंत्र काही समाजविघातक शक्तीकडून केला जात आहे असे माझ्या निदर्शनास आले.
अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यां पुढे व्यक्त केल्यामुळे ही बाब लक्षात घेऊन आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी, महाविकास आघाडी घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट, संभाजी ब्रिगेड, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड, नांदेड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी नांदेड व नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना एका निवेदनाद्वारे देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे आमदार प्रतिनिधी राहुल हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षप्रवक्ते संतोष पांडागळे, अध्यक्ष विनोद कांचनगिरे, संभाजी ब्रिगेडचे संकेत पाटील, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे गजानन पाटील कहाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस चे जीवन पाटील घोगरे,नांदेड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ.ललिता शिंदे बोकारे, माजी नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे डॉ. नरेश
रायेवार, राजू लांडगे, किशनरावकर रावणगावकर, भी. ना.गायकवाड, शिवसेनेचे साहेबराव मामीलवाड, निवृत्ती जिंकलवाड, ब्रिजलाल उगवे, प्रा. शशिकांत हटकर, वैजनाथ माने, भगवान जोगदंड,
पंढरीनाथ रोडे, प्रा.अशोक गोणारकर, संजय कदम, केरबा माने, नामदेव पद् मने, प्रा. गजानन मोरे, भुजंग स्वामी, माणिक स्रोते, पंढरीनाथ मोटरगे, प्रभू राम, अक्षय मुपडे, शेख मोईन लाटकर, दिगंबर माधवराव, शेख नुरोद्दीन, प्रल्हाद गव्हाणे, श्रीमती कोरडे ताई, लक्ष्मीकांत शिरेवार, गणेश माडेवार, वरून पचनोरे, गौरव इबितवार, गणेश जाधव, प्रतीक नवघरे, विशाल तुम्हा, महेश मारावर, निलेश वासमवार, संगम कांचनगिरे, राजेंद्र कुमार बोरलेपवार, संजय लंगडे, ऋषिकेश बोंडावार, शिवम कांचनगिरे, आर्यन कांचनगिरे, यांच्यासह इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.