उस्माननगर, माणिक भिसे। कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर, विस्तार सेवा मंच संयोजक राजकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय संस्कृत प्रतिभा शोध परीक्षा २०२२-२३ अंतर्गत नांदेड जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील समता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय संस्कृत प्रतिभा शोध परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
समता माध्यमिक विद्यालय उस्मान नगर तालुका कंधार येथील मुख्याध्यापक गोविंद बोधे माळ व पर्यवेक्षक राजू आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सहशिक्षक वर्गशिक्षक हे विविध स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात नुकत्याच घेण्यात आलेल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर समाजात रवी कीर्ती संस्कृत अध्यायान केंद्र सांगली यांच्या वतीने राज्यस्तरीय संस्कृत प्रतिभा शोध परीक्षेत नांदेड जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने भव्य स्वागत करून शाबासकीची थाप म्हणून पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातून केवळ समता विद्यालयातीलच विद्यार्थिनींनी नेत्र दीपक यश प्राप्त केले आहे. यामध्ये एकलारे श्रीनाथ छडप्पा ,गवळी ओंकार ज्ञानेश्वर ,मोकले शितल ज्ञानदेव ,तर व्दितीय क्रमांक घोरबांड रावण आनंदा , तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गोरे वैष्णवी मारुती ,गुंडे ॠतुजा जळबा ,काळम स्वाती माधव या शाळेतील विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी नांदेड जिल्हास्तरावर नेत्र दीपक यश मिळविले आहे. समता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली आहे. ही परीक्षा संस्कृत व्याकरणावर आधारित होती.
विद्यार्थ्यांचे व्याकरण शालेय स्तरावर चांगले व्हावे त्याकरिता राज्यस्तरावर परीक्षा रवी कीर्ती संस्कृत केंद्रातर्फे विद्यापीठ, कुलगुरू कालिदास विद्यापीठ दरवर्षी घेत असते. राज्यस्तरावरील परीक्षे मध्ये विद्यार्थी पात्र ठरले आहेत सदरील परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सचिव बा.दे.कुलकर्णी ,माजी मुख्याध्यापक श्यामसुंदरराव जहागीरदार गुरुजी, शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड, पर्यवेक्षक राजीव आंबेकर, राठोड , तसेच विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ.गौतमी गिरगावकर यांच्यासह अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.