
उस्माननगर, माणिक भिसे। अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत , रयतेचे राजे , स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सभागृह महाराष्ट्रातील प्रत्येक गावात निर्माण करावे अशी मागणी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या ई-मेल व्दारे विश्वहिंदू जागरण अभियान, आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रदेशाध्यक्ष , ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांनी केले आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे की , अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत रयतेचे राजे , स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास २०२३- २०२४ या वर्षात ३४९ वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने राज्यात आनंद उत्सव सुरू आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण या ३४९ वर्षानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती करून शिवराज्याभिषेक भेट म्हणून महाराष्ट्रास द्यावी. अशी या निमित्ताने विनंती पूर्वक मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यात संविधान सभागृह लोकसंख्येच्या आधारे दिल्या जात आहे.त्याच धर्तीवर श्री.छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती करावी.या सभागृहा मुळे गोर, गरीब, सर्व जाती धर्मातील जनतेचे विवाह सोहळे , सांस्कृतीक कार्यक्रम इतर समाजोपयोगी कार्य या सभागृहात होण्यास मदत होईल. आशा मागणीचे निवेदन ई-मेल व्दारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कडे शिवशंकर काळे ( विश्वहिंदू जागरण अभियान आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रदेशाध्यक्ष , ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक) यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी निवेदनाची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी ग्रामविकास विभाग यांना पाठविल्याचे पत्राव्दारे कळविले आहे..
