
नांदेड| भारतीय नेटबॉल फेडरेशन व महाराष्ट्र म्युचर नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ४० वी सिनीयर राष्ट्रीय नेटबॉल क्रीडा स्पर्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे १ ते ४ मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

या राष्ट्रिय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघ सहभागी होणार असून त्याकरिता महाराष्ट्र संघ निवड चाचणी सराव शिबिर दसरा मैदान भंडारा येथे १९ ते २८ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान घेण्यात आले. या सराव शिबिरात सहभागी खेळाडु मधून महाराष्ट्र पुरुष व महिला संघ निवडण्यात आला. यामध्ये नांदेड जिल्ह्याचा उत्कृष्ट नेटबॉल खेळाडू चंदन गायकवाड व प्रतिक्षा सोनकांबळे याची निवड महाराष्ट्र संघात झाली.

त्याबद्दल त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाराष्ट्र मेच्युअर नेटबॉल चे अध्यक्ष विपिन भाई कामदार, महासचिव डॉ. ललित जीवनी, सहसचिव श्याम देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. एस.एन. मुर्ती, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन सचिव प्रविणकुमार कुपटीकर, नांदेड नेटबॉल प्रशिक्षक सुमेध गायकवाड, रविकुमार बकवाड यांना दिले असून या निवडीबद्दल नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या वतीने व राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू यश गायकवाड, प्रीती लोखंडे, अनुष्का धनवे, प्रतीक सोनकांबळे, अनिकेत नरनवरे, रोहित वाठोरे, रोहन राक्षसमारे, शुभम लोखंडे, करण धुताडे आदींनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

