
नांदेड| मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.मराठी वाचा, मराठी बोला,मराठी पहा मराठी भाषा ही अभिजात असून काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मुख्याध्यापक यशवंत थोरात यांनी केले आहे.

दीपक नगर तरोडा येथील श्री निकेतन माध्यमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी भाषा हे मानवाला लाभलेले वरदान आहे. माणसांच्या जगण्याला अर्थपूर्ण आणि सुंदर करण्याचं काम मराठी भाषेने केले असल्याचे ही त्यांनी अध्यक्षीय भाषणातून मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यकार विचारवंत कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिक्षकांविषयी कुसुमाग्रज म्हणतात समाजाचा विकास सत्तेने होत नाही किंवा यंत्राने होत नाही तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. समाजात दुर्गुणांची संपत्ती वाढत आहे. अशा समाजाला चांगलं मार्ग दाखवणारा शिक्षक हा आधार आहे.या कुसुमाग्रजांच्या वाक्याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका कांचन सोनकांबळे यांनी करून कविवर्य कुसुमाग्रजांचा जीवन परिचय करून दिला.तसेच सहशिक्षक दंडेकर यांनी मराठी भाषेचा उगम आणि विस्तार व संवर्धन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

मराठी गौरव दिनानिमित्त जागर साहित्याचा अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साहित्यकार यांचा परिचय करून दिला तसेच माय भूमी ही जन्मभूमी हे गौरव गीत सामूहिक गाण्यात आले व महाराष्ट्राच्या गौरव गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच मराठमोळ्या वेशभूषणे उपस्थिताचे लक्ष विद्यार्थ्यांनी वेधून घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोटकेकर कांचन पवार यांनी केले आणि काव्यवाचन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व आभार श्री व्हनशेटे यांनी मानले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

