
नांदेड| मागील 23 वर्षापासून कराटे या क्षेत्रात योगदान देऊन हजारो खेळाडू घडविलेले आहेत. स्वसंरक्षणार्थ मुलींना शारीरिक व मानसिक रित्या सक्षम बलवान बनविनारे सेन्साई एकनाथ पाटील याना वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या शुभहस्ते मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष नागरे यांच्या शुभहस्ते आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व चालते फिरते विद्यापीठ संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रा त कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार दिले जातात.

यावर्षी सेन्साई एकनाथ पाटील यांनी मागील 23 वर्षापासून कराटे या क्षेत्रात योगदान देऊन हजारो खेळाडू घडविलेले आहेत. स्वसंरक्षणार्थ मुलींना शारीरिक व मानसिक रित्या सक्षम बलवान बनविले असून विविध क्षेत्रात आपले कराटे खेळाडू शासन सेवेत कार्यरत आहेत. त्याबद्दल दिनांक 26 फेब्रुवारी रोजी हू बहिर्जी कॉलेज इनडोअर हॉल येथे वसमतचे आमदार श्री राजू भैया नवघरे यांच्या शुभहस्ते एकनाथ पाटील यांना मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष नागरे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार सांस्कृतिक संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख गोदावरी विद्यालय पिंपळगाव निमजी मुख्याध्यापक श्री शंकर डक माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे संकेत पाटील कुलदीप सिंग जट मनोज पतंगे अनुराधा शिंदे व वेगवेगळ्या क्रीडा संघटनेच्या वतीने अभिनंदन केले आहे

