
हदगाव, शे चांदपाशा| भाजपा महीला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चिञा वाघ उपाध्यक्षा प्रणिता देवरे व तसेच प्रदेश समन्वयिका मंगल वाघ यांच्या आदेशाने नादेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वयिकांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हदगाव तालुक्याच्या रहवाशी असलेल्या नादेड जिल्हा भाजपाच्या उपाध्यक्षा लता फाळके यांची किनवट तालुक्याच्या ‘समन्वय ‘पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भाजपा पक्ष संघटन वाढीबरोबर विविध क्षेञांत सामाजिक दृष्टिकोनातून उल्लेखनीय कार्य करणा-या महीलांना प्रोहत्साहन पर त्यांचा सम्मान देण्याचा भाजपा महीला आघडीचा माणस आहे. या दृष्टीने यावेळी महीला दिनाच्या निमित्तानं जिल्हास्तारावर एका महीलेला ‘स्व.सुषमा स्वराज’ यांचे नावे पारितोषिक देवून सन्मान करण्यात येणार असल्याचे ही प्रसिद्ध केलेल्या पञकात म्हटलेले आहे.

भाजपाच्या महीला उपाध्यक्षा लता फाळके ह्या पुर्वी त्या शिवसेनेत होत्या त्यांनी हदगाव शहरातील व तालुक्यातील महीलांचे विविध प्रश्नावर तसेच शहरातील व तालुक्यातील अवैध देशी दारु नागरी समस्या विषयी त्यांनी लढा दिला. तसेच प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडले होते हे उल्लेखनीय आहे.

