
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नोबेल पारितोषिक विजेते थोर शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रमण यांच्या जन्मदिनी 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर्व देशभरात साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी लिटल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव येथे शाळेचे समन्वयक प्रा.के. यु. गारटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरवले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुरज अजनीकर सर (रसायनशास्त्र विभाग प्रमुख शरदचंद्र महाविद्यालय नायगाव)व विशेष अतिथी म्हणून प्रा. मानसिंग ताटे सर (प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय नरसी) प्रा. साईनाथ हिवराळे (प्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय घुंगराळा)यांची उपस्थिती होती.

या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील चिमुकल्या बाल वैज्ञानिकांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच टाकाऊ पासून टिकाऊ असे वेगवेगळे व अतिशय सुंदर असे प्रकल्प यावेळेस सादर केले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विज्ञान दिवसाबद्दल ची माहिती व विज्ञानाबद्दलचे त्यांचे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरज अजनीकर यांनी विज्ञानाचे महत्त्व व विज्ञान ही काळाची गरज आहे, राष्ट्राला समृद्ध बनवण्यासाठी विज्ञानाची मोलाची भूमिका असते हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक एन सविता मॅम, पी एस जाधव सर, ए जी पठाण मॅम, मनीषा मॅम, राचुरे मॅम,संतोष पाटील सर, ठाकूर सर, डी बी पाटील सर, शिवम सर ,एन रवी कुमार सर, प्रियंका जाधव मॅम व शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी मयुरी चव्हाण, ऐश्वर्या गुरुमलवाड ,साक्षी शिवारेड्डी व सौदा सय्यद यांनी केले. गजानन कोलमवार सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

