नवीन नांदेड। नांदेडचा हाडको परिसरातील रहिवाशी साईप्रसाद लक्ष्मण पांचाळाला पुण्यात दि २३ फेब्रुवारी रोजी ज्योत्सना भोळे सभागृह हिराबाग येथे महाराष्ट्र कल्चरल सेंटर तर्फे पहीला स्वरभाव पूरस्कार प्रदान करण्यात आला,मेवाती परंपरेतील यूवा गायक यांना मानपत्र व रोख ५o हजार रूपयाचे धनादेश देऊन पूरस्काराने सन्मानित करण्यात आले .
ज्योत्स्ना भोळे सभागृह पुणे येथे शतायुषी समीक्षक कवी जेष्ठ समीक्षक . कृ.पारधी सरांच्या हस्ते “स्वरभाव पुरस्कार ” प्रदान करूण गौरव करण्यात आला. साई प्रसाद पांचाळ याने कमी वयात संगीत क्षेत्रात मौलकी संशोधन करणाऱ्या आभ्यासकाला कींवा भाव पक्षाच्या चिंतनातुन आविष्कार करणाऱ्या यूवा कलाकारास हा पुरस्कार देण्याची संकल्पना जेष्ठ समीक्षक पारधी यांनी मांडली होती.
त्यानूसार पहील्या वर्षीच्या पूरस्कारासाठी साई पांचाळ यांची निवड करण्यात आली ,यावेळी पारधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मालकंस रागाचे भावात्मक वर्णन करणारी त्यांची कविता सुभाष इनामदार यांनी सादर केली, पूरस्कार प्रदान समारंभाचे प्रास्ताविक संगीत रचनाकार डॉ .चैतन्य कुंटे यांनी केले, तर संस्थेतर्फे राजेश देशमुख ,यांनी आभार व्यक्त केले तर, ज्योत्सना भोळे सभागृहात या कार्यक्रमासाठी संगीत रसिक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.