नविन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी संचलित संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव व पदाधिकारी , शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे आपला कार्यकाळ पूर्ण करून शिवाजी महाविद्यालयाचे माध्यमिक व शालांत परीक्षेत नावलोकिक झाले. असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्हि.के.हंगरगेकर यांनी सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभ सोहळया मध्ये केले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी संचलित , शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड चे प्राचार्य व्हि.के.हंगरगेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक कुटुंबाचा ऊपसिथीत निरोप समारंभ सोहळा २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एन.एम.भारसावडे तर प्रमुख प्राथमिक मुख्याध्यापिका वंदना एंकुठवार, समन्वयक एस.एम.देवरे,वरीष्ठ लिपीक व्हि.एस.वाघमारे, यांच्या सह माजी नगरसेविका प्रा.ललीता शिंदे,सेवानिवृत्त अभियंता चंद्रकांत हंगरगेकर,अनिल पाटील बाभळीकर,मान्यवरांच्यी ऊपसिथी होती.
निरोप समारंभाला उत्तर देतांना मला माझ्या जिवनात शिक्षक पेशा हा कौटुंबिक वारसा मिळाल्याचं सांगुन सेवा काळात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याची संधी जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी संचलित संस्था व शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उपलब्ध करून दिली कार्यरत असतांना शैक्षणिक क्षेत्रात विविध परिक्षेत शाळेचे नाव उज्ज्वल केले असल्याचे सांगून दहावी, बारावी सह ईतर अनेक स्पर्धा परीक्षा,व विविध परिक्षेत सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले सांगितले, महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनीनी अभ्यासक्रम सत्यात ठेवून विविध प्रश्नांवर व जादा तासिका माध्यमातून सरावर भर ठेवुन हे यश संपादन केले असल्याचे सांगितले.
निरोप समारंभ प्रसंगी शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तर माजी नगरसेविका सौ ललीता शिंदे व सेवानिवृत्त प्रा.मुकुंदराव बोकारे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सय्यद, हंबर्डे, देवरे यांनी मार्गदर्शन पर भाषणे केली तर अध्यक्षीय समारोप पर्यवेक्षक भारसवाडे यांनी सेवा काळात शिक्षणात अग्रेसर राहुन अनेक ऊपकम राबबुन शाळेचे ना्व लोकीक केल्याचे सांगितले,औ आभार प्रदर्शन बसवदे यांनी तर सुत्रसंचलन सौ.देगावकर यांनी केले. या सोहळ्याला शिंदे, एस.एन.देवकर,रगडे, बिरगे, मोरे,कंकरे,नरवटे,मुदीराज ,एस.एन.शिंदे, के.एल.जोगंदड, सौ. पल्लेवाड,सौ.देगावकर,सो.जामकर, शंकर कापसे, विठ्ठल शिंगणवाड,राम विजापुरे, गजानन सुरेवाड,सुभाष भवर,दता सुर्यवंशी, नामदेव कोनापुरे यांच्या सह शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक, नरसिंह प्राथमिक शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यी उपस्थिती होती.