नांदेड। पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं. ५६४/२०२२ कलम ३९२, ३४ भा.दं.वि गुन्हयातील आरोपीताकडून पोलिसांनी ३० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी किमती १,५६,०००/- रु. ची हस्तगत करून फिर्यादी यांना परत केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे.
फिर्यादी नामे तुकाराम अनंतराव सावंत, वय ४८ वर्षे, व्यवसाय पत्रकार, रा. शंकरनगर असर्जन नांदेड यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर होऊन फिर्याद दिली होती की, दिनांक १७/०९/२०२२ रोजी मॉर्निंग वॉकसाठी घरून हस्सापूर ब्रिज रोडने पायी चालत जातांना वेळ ०६:३० वा. मोरगे सिमेंट प्लॅटचे अलीकडे मिराई नगर पाटीजवळ गेला असता तेथे दोन अनोळखी इसम अंदाजे २५ ते ३० वयोगटातील इसमाने फिर्यादीला खंजरचा धाक दाखवून फिर्यादीचे गळ्यातील सोन्याची चैन ३० ग्रॅम वजनाची किमती १,५६,०००/- रु. ची बळजबरीने तोडून घेवून नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकल वरून निघून गेले. यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुरनं. ५६४ / २०२२ कलम ३९२, ३४ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हयांत तात्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक श्री शशिकांत महावरकर साहेब, परीक्षेत्र नांदेड, तात्कालीन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, उपविभाग इतवारा श्री. डॉ. सिध्देश्वर भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे, मदतनीस पोहेकॉ / ५१८ गटलेवार यांना योग्य मार्गदर्शन करून सदर गुन्हयांतील आरोपी नामे रोहन अंबादास गायकवाड वय २० वर्षे, रा. विष्णुनगर नांदेड ता. जि. नांदेड या आरोपीकडु गुन्हयांतील गेला माल ३० ग्रॅम सोन्याची साखळी किंमत अंदाजे १,५६,०००/- रु. ची आरोपीतांनी जबरी चोरून नेलेली ती जप्त केली होती, ती साखळी फिर्यादी यांना आज सन्मानपुर्वक परत केली आहे.
नांदेड जिल्हा दौऱ्यावर आलेले मा. अप्पर पोलीस महासंचालक श्री. डॉ. रविंद्र कुमार सिंगल, मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शशिकांत महावरकर, परीक्षेत्र नांदेड, मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, मा. अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा श्री. डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक, अशोक घोरबांड तपास अधिकारी पोउपनि महेश कोरे, पोहेकॉ / ५१८ गटलेवार व डी. बी. पथकाचे यांचे विशेष कौतुक केले आहे.