
नविन नांदेड। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील संपादीत होणा-या जमिनींचा मावेजा बाजार भावाप्रमाणे मिळावा यासाठी शेतकरी कृती समिती नांदेड यांच्या वतीने आढावा बैठक घेऊन आंदोलन दिशा ठरविण्यात आली असून या बाबत शासन निर्णय घेत नसल्याने बांधीत शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन ८ मार्च रोजी सरण आंदोलन करण्यासाठी १५ मार्चला सरण आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समितीच्या वतीने दासराव हंबर्डे यांनी सांगितले.

तुप्पा, बाभुळगाव, गुंडेगाव, पांगरी,कांकाडी ,बाभुळगाव, पिंपळगाव, जैतापूर, नाळेशवर,बोरगाव,यासह १२ गावातुन हिंदू हद्रय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जालना नांदेड मध्ये जात असुन सदरील गावातील जमीनी ह्या शहरालगत महानगर पालिका ,एम,आय,डि.सी लगत आहे तसेच काही जमीनी कमर्शियल झोन मध्ये आहेत,सधा या जमिनी अतिशय भारी किमतीच्या म्हणजे बाजारभाव एक ते दिड कोटी किमतीच्या आहेत, परंतु शासन भुसंपादन करतांना रेडीरेकरन दराप्रमाणे करत आहेत.

वास्तविक रेडीकरण दर अतिशय कमी म्हणजे चार ते पाच लाख रुपये प्रति एकरी आहे, शेतकयाचे कमी दर मिळत असल्यामुळे न भरून नुकसान होत आहे,बांधीत शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळत नसल्याने शेतकरी कृती समितीची आढावा बैठक घेऊन कृती समितीचा माध्यमातून अत्यल्प जमीनीच्या मावेजा देत असल्यामुळे बाभुळगाव पाटीवर २ मार्च रोजी आढावा बैठक आंदोलन केले, या बाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या सह मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देव्रंद फडणवीस , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेता अजित दादा पवार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर,

यांचासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हाधिकारी राऊत , भूसंपादन अधिकारी श्री माने विकास, तहसीलदार किरण आंबेकर,नांदेड यांना या बाबत निवेदन व प्रत्यक्ष भेट घेतली,व निवेदन दिले आहे,यावेळी बाभुळगाव शिवारात सरण आंदोलन येत्या 15 दिवसात करणार असल्याचे दासराव हंबर्डे,अशोकराव मोरे,माजीद सेठ,गिरे पाटील,चांदु कदम, माधवराव कदम, ठाकूर, किशोर इंगळे, संतोष मस्के, भगवानराव पोलीस पाटील, यांच्या सह १२ गावातील बांधीत शेतकरी बांधव यांच्यी उपस्थिती होती.

आढावा बैठकीचा अनुषंगाने ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरवटे व पोलीस अंमलदार बालाजी दंतापले, बि.डी.बिरजदार यांनी बंदोबस्त ठेवला होता.

