
हदगाव, तामसा, गजानन जिदेवार। वायपना बुद्रुक ( ता.हदगाव) येथील नरवाडे कुटुंबियाची परिस्थिती हालाखीची असतानाच, नुकतचं त्यांच्या मुलीचं लग्न जुळलं. वडील, बऱ्याच दिवसापासून बीमार मनोरुग्ण आहेत. एकटी आईच मोल मजुरी करून कसा बसा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत असे, त्यातच लग्न म्हणजे खर्चिक बाब, हे लग्न कसं पार पडणार! या विवेचनेत सदर कुटुंब सापडल्याचे चित्र आहे. संकटात सापडलेल्या या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपत कुणीतरी आर्थिक उभारी देण्याची गरज आहे.

प्रत्येक आई- वडिलांना आपल्या लेकीचं लग्न थाटामाटात करायची हौस असते. परंतु, कधी पैसा आड येतो तर कधी प्रतिष्ठा. कधी समस्येचा डोंगर उभा ठाकलेला असतो. असंच वायपना बुद्रुक ( ता.हदगाव) येथील विलास नरवाडे यांच्या वधू नदंनी या मुलीचे लग्न हिंदू रीतीरीवाला प्रमाणे वर अनिल पांडुरंग गव्हाणे रा.पळसा ता. हदगाव यांच्याशी दि.१३/३/२०२३.ठरलं आहे. लग्नासाठी खर्चिक बाब आणायची कुठून, गणगोताकडून ( दोन मावश्या) थोडीफार आर्थिक मदत झाली आहे. इतर पैशाची जुळवाजुळ करायची कशी? वडील बऱ्याच दिवसापासून आजारी मनोरुग्ण , एकट्या आईवरच संपूर्ण कुटुंबाची भीसत, नियमित रोजंदारी मिळत नसल्याने, आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे.

लेकीचं लग्न तर अगदी जवळ येऊन ठेपलं ,सावकारी कर्जही कोणी देईनात. कन्यादान करायचं कसं…? यांची चिंता सदर कुटुंबीयांना सतावत आहे. संकटात सापडलेल्या या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. असे झाल्यास आपली छोटीशी मदत गरीब ,गरजू, कुटुंबियांसाठी लाख मोलाची ठरणार आहे. तरी परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

