नवीन नांदेड। प्रामाणिक सेवा करा, सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजिक कार्यात सहभागी व्हा, मि दिल्ली चा रहिवासी असला तरी ही महाराष्ट्र कर्म भुमि असल्याचे प्रतिपादन संत श्री रोहीदास सभागृह, बळीरामपुर नांदेड, पोलिस भरती बॅच २००८ व ग्रामपंचायत कार्यालय, बळीरामपुर यांचे सहभागातुन ज्ञानवर्धिनी वाचनालयाचे उद्घाटन बुधवारी १ मार्च रोजी उद्घाटन प्रसंगी डॉ. रविंद्र कुमार सिंगल सहायक पोलिस महासंचालक यांनी केले.
बळीरामपुर ग्रामपंचायत कार्यालय व व २००८ पोलीस भरती शाखेचे वतीने संत श्री रोहिदास सभागृह येथे सहभागातुन ज्ञानवर्धनी वाचनालय ऊदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी आनंदराव गुंडीले,रेणुका इंद्रजीत पांचाळ सरपंच बळीरामपुर ग्रामपंचायत नांदेड, उपसरपंच नागेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नागोराव अंबटवार, वामनराव विष्णुपूरीकर, कपिल सोनकांबळे,शेख जकीर शेख खाजा, रवि भंडारे, संग्राम गड पवार, सौ. आरती डोईबळे, दासरवाड, अशोक वाघमारे,संभाजी आढाव,संदीप डुमणे व सर्व सदस्य या वेळी उपस्थित होते.
पोलीसांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा, माझ्या काळात सहावे वाचनालय ऊघडल्याचा आंनद होत असल्याचे सांगून १५ वर्षा नंतर माझ्या काळात भरती झालेले पोलीस कर्मचारी पाहुन आंनद झाल्याचे सांगितले, माझ्या काळातील पोलीस भरती झालेले पोलीस कर्मचारी आजही विविध क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगितले. तर पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी रविंद्र सिंगल यांनी नांदेड येथे पोलीस दलासाठी केलेले कार्य उलेखनीय असल्याचे सांगून पोलीस महासंचालक नांदेड पोलीस दलात रविंद्र सिंगल आज ही कार्यरत असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक संरपच मुन्ना पांचाळ यांनी केले तर सुत्रसंचालन दिंगाबर शिंदे यांनी केले, या सोहळ्याला उपनिरीक्षक आंनद बिचेवार, विजय पाटील व शिवानंद कानगुले, राजेश झुंबाडे,गोविंद मुंडे,गुरू कारामुंगे, विलास धुमाळ,नितीन केंद्रे, संदीप घोगरे, अमर शिंदे,रंजीता सोनकांबळे,कांचन कसबे, अर्चना बोरलेपवार कोमल आचेवर,सुकेशनी हनवंते,रोहीणी सुर्यवंशी,मेहजबिन शेख, पुष्पा कापसे, जना सुरेवाड सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थी, विद्यार्थी यांच्या सह ग्रामस्थ नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होते.