हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर यात्रा महोत्सवात विवीध खेळ, शालेय स्पर्धा, आयोजीत करण्यात आल्या असुन, स्पर्धांना ग्रामीण परीसरातील खेळाडुंसह नागरीकांचा भरपुर प्रतीसाद मिळत आहे. स्पर्धा अंतीम टप्यात आल्या असुन, दिनांक २८ फेब्रुवारी व ०१ मार्च रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्ध्येमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा येथील बीरसा मुंडा क्रीडा संघाने विजयश्री प्राप्त केली आहे. आ.माधवराव पाटील जवळगांवकरांनी जाहीर केलेल्या २१००० रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक मंदिर समीतीचे सेकेटरी अनंतराव देवकते आणि नायब तहसीलदार श्री ताडेवाड यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
भारतीय खेळात प्रामुख्याने महत्व असलेल्या कब्बडी स्पर्धा महाशिवरात्र यात्रेत नेहमीप्रमाणे जवळपास २ दिवस चालल्या. यात हदगांव, हिमायतनगर, किनवट, माहुर, उमरखेड तालुक्यातील एकुन १२ क्रीडा संघानी सहभाग नोंदवीला होता. दि.२८ रोजी या कब्बडी स्पर्धेला दुपारी सुरुवात झाली, फायनल झाले नसल्याने दुसऱ्या दिवशी दि.०१ रोजी दुपारी २ वाजल्यापासुन सुरु झालेली कब्बडी स्पर्धा रात्री उशीरापर्यंन्त म्हणजे प्रकाश झोतात चालली. या स्पर्धेचा अंतीम सामना बिरसा मुंडा एकंबा आणि वसंतराव नाईक मुरली या दोन क्रीडा संघाच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाला.
त्यात विदर्भातील एकंबा येथील बीरसा मुंडा संघाने अव्वल क्रमांकाची बाजी मारली विजयी संघास २१०००/- रुपयाचे बक्षीस देण्यात आले. दुसर्या क्रमांकाचे पारीतोषीक रुपये १५००१/- विदर्भातील मुरली येथील वसंतराव नाईक क्रीडा संघास देण्यात आले. तिसरा क्रमांकाचे पारितोषीक रुपये ९००१/- बक्षीस हिमायतनगर तालुक्यातील हनुमान संघ पार्डीला देण्यात आले. यावेळी कब्बडीचे पंच म्हणुन सोनबाराव राऊत, नायब तहसीलदार श्री तांडेवाड, बी.आर.पवार, क्रीडा समीतीचे अध्यक्ष ऍड दिलीप राठोड, उपाध्यक्ष बाबुराव बोड्डेवार, सचिव के.बी.शंनेवाड, विठ्ठलराव पार्डीकर, पी.के.चव्हाण, पावडे सर, सोमवंशी सर यांनी काम पहिले. यावेळी परमेश्वर ट्रस्टचे सदस्य, क्रीडा प्रेमी नागरीक व हजारों खेळाडु प्रेमी नागरीक उपस्थीत होते.