
लोहा| कुरूळा येथील शिक्षक जितेंद्र राऊत (वय ४० वर्ष) त्यांना एक मार्च रोजी अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. हृदय रोगतज्ञ डॉ मिलिंद धनसडे यांच्या लोहा स्थित रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल केले. या रोगाचा चार तासाच्या आत रुग्णांवर उपचार झाला तर तो बरा होऊ शकतो. असा स्थितीत डॉक्टरांनी त्यारुग्णाचे सिटीस्कॅन काढायला सांगितले. डॉ महेश सूर्यवंशी यांनी तात्काळ सिटीस्कॅन केले आणि नेमका उपचार सुरू झाला आणि रुग्ण या पक्षाघाताच्या आजारातून बाहेर आला.लोह्या सारख्या ग्रामीण तोंडवळा असलेल्या शहरात अर्धांगवायूसारखा रोग आवाक्यात येऊ शकतो त्यात वेळ व वेळेवर उपचार महत्वाचे ठरतात आणि डॉ धनसडे यांनी केलेले उपचार असा गंभीर व दिर्घकालिन शारीरिक अपंगत्व येणाऱ्या आजारावर यशस्वी ठरले.

कुरुळा (ता कंधार ) येथील शिक्षक जितेंद्र राऊत यांना दोन दिवसापूर्वी पक्षघाताचा तीव्र झटका आला होता लोह्याच्या डॉ मिलिंद धनसडे यांच्या हॉस्पिटलमध्ये आणताना जवळपास दोन तास उलटुन गेले होते. सहकारी डॉ शिवकुमार भोसीकर यांनी स्ट्रोक ( अर्धांगवायू ) आहे असे सांगताच डॉ मिलिंद यांनी तातडीन डॉ महेश सूर्यवंशी यांना कळविले व त्याच्या डाय लगनोस्टीक सेंटरला पाठविले आणि दोन तास झाले त्यामुळे रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन सुरू केले.

अर्धांग वायू च्या रुग्णांमध्ये पहिल्या चार ते साडेचार तासात सिटीस्कॅन नॉर्मल असेल किंवा रक्तस्त्राव नसेल तर अर्धांगवायू पुढील 24 ते 72 तासांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यास एक महागाचे इंजेक्शन देत असतात. हे इंजेक्शन जेवढे महाग आहे तेवढेच मोलाचे काम ते करते. एवढी सगळी कोड्याची परिस्थिती असताना डॉक्टर धनसडे यांनी दिलेला विश्वास रुग्ण नातेवाईक याना पटला. इंजेक्शन देण्या अगोदर रुग्णास त्याचे नावही पूर्ण उच्चारता येत नव्हते, व तसेच उजवा हात आणि उजवा पाय पूर्ण निकामी होता. रुग्णाचे पूर्ण उरलेलं आयुष्य खाटावर जाणार की रुग्ण पूर्ण बरा होणार याची शाश्वती नव्हती. रुग्ण नांदेडला पाठवून त्याचा, मोलाचा अजून एक ते सव्वा तास घालवायचा की इथेच ते इंजेक्शन द्यायचे या स्थितीत डॉक्टरांनी रुग्ण नातेवाईक यांचा विश्वासात घेतले ते इंजेक्शन योग्य त्या पद्धतीने दिले.

अर्धा एक तास भरपूर मानसिक घालमेली झाली आणि रुग्णास त्याचे नाव विचारले आणि त्यांचे बोलणं स्पष्ट उच्चार केला आणि डॉक्टर व टीम यांना आनंद झाला उजवा हात व उजवा पाय उचलायला सांगितला त्यांनी सहज पूर्ण वरपर्यंत उचलला….! वेळेत आलेला रुग्ण, नातेवाईकांनी दाखवलेला विश्वास, Time आणि Team मॅनेजमेंट या सर्वांचे हे फलित लोह्या सारख्या तालुक्यावर झाले. असे काही एक क्षण डॉक्टर व वैदयकीय क्षेत्रात साठी कित्येक वर्ष काम करण्यासाठी प्रेरणा देतात. रुग्ण नातेवाईक यांचे डोळे पाणावले डॉ धनसडे त्याच्यासाठी देवच ठरले.

