Sunday, April 2, 2023
Home अर्थविश्व आयसीआयसीआय बँकेने कर्ज भरलेली असतानाही नोटीस देऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल दहा हजाराचा दंड -NNL

आयसीआयसीआय बँकेने कर्ज भरलेली असतानाही नोटीस देऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल दहा हजाराचा दंड -NNL

नांदेड ग्राहक आयोगाचा निकाल

by nandednewslive
0 comment

नांदेड| शहरातील आयसीआयसीआय बँक शिवाजी पुतळा शाखेकडून ग्राहकाला गृह कर्ज देताना रिकाम्या असलेल्या छापील फॉर्मवर फॉर्म न भरताच सह्या घेतल्या. कर्जाचे अनियमित हप्ते भरण्याची चुकीची नोटीस पाठवली. बँकेने सेवा देण्यात कसूर केल्याबद्दल ग्राहकाने ग्राहक आयोगाकडे तक्रार नोंदवली. ग्राहकाच्या तक्रारीची आयोगाने पडताळणी करून बँकेस दहा हजार रुपये तक्रारदारास देण्याचा आदेश नुकताच दिला.

दिनांक 24 मार्च 2022 रोजी आय सी आय बँक शिवाजीनगर यांच्याविरुद्ध एडवोकेट दिपाली डोणगावकर यांच्यामार्फत ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. बँकेच्या शिवाजीनगर शाखेकडून ग्राहकाने गृहकर्ज उचललेले होते. सदरील गृहकर्जाच्या थकीत व चालू कर्जाची सहा लाख रुपये बँकेच्या एजंटाकडे नगदी जमा करण्यात आली व बँकेची पावतीही अर्जदारास मिळाली. सदरील रकमेतून सहा महिन्यांच्या हप्ता रक्कम वजा करून उर्वरित रक्कम मुद्दल रकमेत जमा करण्यात येईल असे आश्वासन बॅंक कर्मचाऱ्याने अर्जदारास दिले परंतु अर्जदारास आय सी आय सी आय बँकेकडून अचानक 16 फेब्रुवारी 2013 मध्ये नोटीस देण्यात आली. या नोटीसीद्वारे अर्जदाराकडून रक्कम रुपये 11 लाख 13 हजार 995 इतकी रक्कम बाकी आहे व तीन भरल्यास सर्फिअस कलम 13/2 दोन नुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी धमकीही या नोटीसीत देण्यात आली होती.

अर्जदाराने आयसीआयसीआय बँकेकडे स्टेटमेंट देण्याची मागणी केली परंतु बँकेने अर्जदारास स्टेटमेंट देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे अर्जदारास मानसिक धक्का बसून तो आजारी पडला. त्यानंतर अचानक आयसीआयसीआय बँकेने दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी पुन्हा नोटीस पाठवली. त्या नोटीस मध्ये अर्जदाराच्या गृहकर्जाचे पुनर्निरीक्षण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे अर्जदाराने परत बँकेकडे अकाउंट स्टेटमेंट देण्याची विनंती केली, परंतु बँकेने दिनांक 10 मार्च 2010 रोजी वजा केलेली सहा लाख रुपये रक्कम याचा उल्लेख असलेला खात्याच्या उतारा ग्राहकास दिला नाही.

यावरून आय सी आय सी आय बँकेने ग्राहकाची फसवणूक केल्याने सेक्शन 34 नुसार स्पष्ट झाले. या सर्व बाबीचा विचार करून एडवोकेट दिपाली डोणगावकर यांनी ग्राहक आयोगाकडे आय सी आय सी आय बँके विरुद्ध त्रूटीची सेवा दिल्या बद्दल नुकसान भरपाईची मदत मिळण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला होता.

ग्राहक आयोगाने प्रकरणाची पडताळणी करून आयोग ग्राहक अध्यक्षा श्रीमती अनुराधा सातपुते, श्री रवींद्र बिलोलीकर व श्रीमती कविता देशमुख यांनी आयसीआयसीआय बँकेने अर्जदाराच्या खात्यात जमा न केलेली सहा लाख रुपयाची रक्कम 10 मार्च 2010 पासून दसादशे बँकेच्या व्याजदरानुसार 45 दिवसाच्या आत देण्यात यावीत तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल बँकेने दहा हजार रुपये तक्रारदारास द्यावेत असा आदेश दिला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!