नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नांदेड जिल्ह्यातील मस्टर असिस्टंट संघटनेचे महत्व पुर्ण बैठक दि.४मार्च रोजी शहरातील मारवाडी धर्मशाळा जवळ असलेले कृष्ण मंदिरात दुपारी एक वाजता संघटनेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून मस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य सरचिटणीस तुकाराम जी मोरे देगावकर हे उपस्थितीत राहणार आहेत. बैठकीत दि. ७ सप्टेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिलेल्या निर्णयानुसार शासनाने आदेश देण्याबाबत राज्य संघटने मार्फत शासनाकडे पाठपुरावा करीत असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.या बरोबरच हजेरी सहाय्यकाच्या निवृती बदल महाराष्ट्र शासन आदेश देण्याबाबत विलंब होत असल्याने अवमान याचिका दाखल करणे सह अनेक महत्वपूर्ण विषयावर विचार विनिमय करण्यात येणार आहे.
या बैठकीस नांदेड जिल्ह्यातील सर्व मस्टर असिस्टंट कर्मचारी बंधूनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कोरे, सरचिटणीस व्यंकटराव बामणे, कार्याध्यक्ष अलिमोदीन काजी, उपाध्यक्ष बळीराम काकडे, एम एम कदम, अर्जुन भोसले, श्रीरिष साले, सुरेश कपाटे इनायत आली अन्सारी मैनोदीन पठाण आयुब खान साहेबराव मगरे उत्तमराव नरवाडे देविदास चव्हाण नागनाथ हटकर सतीश जोशी विनायक औसेकर केशवराव आडे नरसिंगजी चप्पलवार तुकाराम गायकवाड दिलीप गोविंदवार बंकटरावजी माळेगावे मधुकर श्रीरामे शेख अलाउद्दीन काशिनाथजी गोसलवाड नागोराव मिराशे पंडू चावरे दिगंबर वाकोरे दिगंबर भेंडेकर विजय सांगवीकर लक्ष्मण जोशी डी एन कुलकर्णी विलास गिरी संभाजी कोकाटे प्रकाश संगमवार नागनाथ झगडे बाबुराव गुमडे आदींनी केले आहे.