नायगाव, रामप्रसाद चन्नावार। दलीत पॅंथर सुवर्ण महोत्सव सोहळा निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांचे उद्घाटक मा ना रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कार्यक्रमाची दीप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामीण भागातील रिपाई कार्यकर्ते असंख्य मोठी गर्दी केली होती. रिपाई आठवले नांदेड जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी धम्मदीप भद्रे कांडाळकर मित्र परिवार यांच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला .