
उस्माननगर, माणिक भिसे। वंचित बहुजन आघाडीसौरभ पवार यांची वंचित आघाडीच्या युवा जिल्हाउपाध्यक्षपदी निवडच्या नांदेड दक्षिण युवा जिल्हा उपाध्यक्षपदी लाठ (खु) ता.कंधार येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ पवार यांची निवड करण्यात आल्याचे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात नियुक्तीचे पत्र देऊन जाहीर करण्यात आले आहे.

मागील अनेक वर्षांपासून सौरभ पवार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून वंचित बहुजन आघाडीत ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत. सौरभ पवार हे समाजाच्या विविध कार्यात स्व :ताला समाजासाठी वाहून घेतले आहे.समाजा विषयी असलेली तळमळ पाहून पक्षश्रेष्ठीने सौरभ पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची जन माणसात तळमळीचा कार्यकर्ता म्हणूनही ओळख आहे.. गत लोकसभा, विधान सभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला आहे. कंधार लोहा मतदार संघातील युवा नेते अशी त्यांची ओळख आहे. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी पुणे येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांच्या नेतृत्वाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, प्रदेश महासचिव राजेंद्र पतोडे, राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रदेश युवा आघाडीचे सदस्य अक्षय बनसोडे, जिल्हा महासचिव श्याम कांबळे यांच्या मार्गदर्शनात हाके यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या समवेत युवकांची मोठी फळी युवा कार्यकारणीत दिली असून नांदेड जिल्ह्यातील पक्ष बळकट करण्याची व मोठ्या प्रमाणात युवकांना पक्षात सामावून घेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. युवा आघडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी लाठ खु.ता.कंधार येथील सौरभ पवार यांची या कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने व मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

