
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशीवरात्री यात्रा समाप्तीच्या दिशेने वाटचाल करीत असुन, दि.०१ मार्च रोजी संपन्न झालेल्या सायंकाळच्या विविध कला गुणदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील १० ते १२ शाळंानी सहभाग घेऊन कला – अविष्कार सादर केली. यात हिमायतनगर येथील सायप्रस इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अरे संसार संसार या गीतातून उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले. या शाळेतील विदयार्थ्यांच्या कलेला प्रथम क्रमांकाचे ११००१ रुपयाचे बक्षीस मंदिर संस्थानच्या पदाधीका-यांच्या हस्ते देऊन गौरवीण्यात आले आहे.

तर घारापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या कला- अविष्कारास प्रेक्षकांची दाद मिळाली, या शाळेस व्दितीय क्रमांकाचे ७००१ रुपयाचे पारीतोषीक मंदिर सदस्याच्या हस्ते देण्यात आले. तर शहरातील आरेन्स इंग्लिश स्कुलच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या गीतास तृतीय क्रमांकाचे ५००१ रुपयाचे बक्षीस देऊन गौरवीण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसपूर या शाळेला चौथा क्रमांक, जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, हिमायतनगर पाचवा क्रमांक, गुरुकुल इंग्लिश स्कुलचा सहावा क्रमांक, गणेशवाडी जिल्हा परिषद शाळेला सातवा क्रमांक तर कोल्हारी येथील जिल्हा परिषद शाळेला आठव क्रमांकाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विवीध गीतांवन धम्माल अशी सामाजिक, सांस्कृतिक, देशभक्ती आणि धार्मिक गीते सादर करुन उपस्थीतांची मने जिंकली. यावेळी शाळेच मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षीका, शालेय मुला-मुलींसह त्यांचे पालक, परमेश्वर मंदिर यात्रा समीतीचे सदस्य व नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते. या स्पर्धेसाठी विशेष करुन शहर व ग्रामीण परिसरातील महीला पालकांनी खास करून उपस्थीती लावली होती.

