नांदेड| होळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून नांदेड, पूर्णा, हिंगोली, अकोला मार्गे काचीगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीची एक फेरी पूर्ण करण्यात येणार आहे, ती पुढील प्रमाणे:
अनु क्रमांक | गाडी क्रमांक | कुठून-कुठे | दिनांक |
1 | 07053 | काचीगुडा-बिकानेर | 04.03.2023 |
2 | 07054 | बिकानेर-काचीगुडा | 07.03.2023 |
गाडी क्रमांक 07053/07054 काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा विशेष गाडी :- हि गाडी प्रवासात मेदचल, वादियाराम, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, वडोदरा, गेरात्पुर, अह्मेदाबाद, पालमपूर, अबू रोड, फलना, मारवार, पाली मारवार, लुनी मारवार, लुनी, जोधपुर, गोतन, मर्त रोड, नागपूर आणि नोखा या रेल्वे स्थानकावर थांबेल. या गाडीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत ,स्लीपर क्लास आणि जनरल चे डब्बे असतील.