
बिलोली/नांदेड। बिलोली शहरातील ईनामी खिदमतमाश जागेवरील राज्य संरक्षीत स्मारक असलेल्या ऐतिहासिक शहिद नवाब सरफराज खॉन यांच्या लगत असलेल्या ईनामी जागेवर झालेल्या अनाधिकृत बांधकासह अतिक्रमणाचा वस्तुनिष्ठ अहवाल देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या बिलोलीचे झोळेबाज मंडळ अधिकारी लक्ष्मण तोटावार व कर्तव्यदक्ष तहसिलदार यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करुन सदरील अहवाल तक्रारदार यांच्या समक्ष बनवुन कार्यालयात विना विलंब सादर करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

नवाब सरफारज खॉन शहिद दर्गा व मस्जिद च्या नावे बोधन रोडवर असलेल्या ईनामी जमीनीवर कोणत्याही कार्यालयाची परवानगी न घेता गावातीलच काही व्यक्ती मिर्झा शौकत बेग महेमुद बेग,मिर्झा अजीज बेग अमजत बेग व त्यांचे नातेवाईक यांनी मस्जिद व दर्गाची खिदमतमाशची असलेली ईनामी जमिन स.नं.५७७,५८० च्या अंदाजे ५ एकर जमीनीवर अनाधिकृतपणे कब्जा करुन हि जागा लोकांना भाड्याने देणे,विक्री करणे,लिजवर देणे,गहान ठेवणे,जागेची अदला बदल करणे अश्या अनेक प्रकारे या जमिनी संदर्भात व्यवहार करण्यात आले आहे.याविषयी येथील मुसल्लीयान यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पुरातत्व विभाग,तहसिल यासह विविध शासकिय कार्यालयात वेळोवेळी लेखी स्वरुपात तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेत पुरातत्व विभागाने तहसिल कार्यालयास पञ पाठवून सदरिल ईनामी जागेवर झालेले अतिक्रमण व ईतर सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्यास सांगितले होते.परंतु येथिल मंडळअधिका-यांनी अजूनही अहवाल सादर केला नाही.त्यामुळे या मंडळअधिकारी व तहसिलदार यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी एजाज फारुखी तुराब, शेख सलीम सेठ ,अब्दुल रशीद सेठ,शेख वाजीद, खाजा मैनोद्दीन,गफूर खुरेशी,शेख पाशा हुसेनसाब गादीवाले यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.

