Sunday, April 2, 2023
Home हिमायतनगर परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड योगेश मुंडकरने जिंकला; तळपत्या उन्हात रंगलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी -NNL

परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड योगेश मुंडकरने जिंकला; तळपत्या उन्हात रंगलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी -NNL

५५ हजाराहून अधिकच्या कुस्त्या झाल्या संपन्न

by nandednewslive
0 comment

हिमायत्तनगर/नांदेड, अनिल मादसवार| संबंध भारतात प्रसीध्द हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर यात्रेतील कुस्त्यांची दंगल दि.०४ मार्च शनिवारी दुपारी ०१ वाजता बालमल्लाच्या कुस्तीने सुरुवात झाली. यात शेवटची अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती योगेश मुंडकरने जिंकुन बजरंगदलाच्या ११ हजारच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची मनाची कुस्ती निलेश पैलवान बोरगडीकर यांनी जिंकली आहे.  

येथील श्री परमेश्वर मंदिरातून ढोल तश्याच्या गजरात मिरवणूक काढून दुपारी ०१ वाजता लहान मोठ्या बालकांच्या कुस्त्याला सुरु झाल्या. या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाव्वीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते सेक्रेटरी अनंतराव देवकाते यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रथम संत्र्या मोसंबीच्या कुस्त्या त्यानंतर १०, २०, ३०, ५०,१००, २००, ५०० रुपयाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी ११००१ रुपये आणि दुसर्या क्रमांकाचे ५००१ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. सायंकाळी ८ वाजता प्रकाश झोतात सुरु झालेली पहिली मनाची कुस्ती हि योगेश मुंडकर व संदीप पाटील या दोघांच्या तुल्यबळ लढतीत झाली. हलगीच्या तालावर सुरु झालेल्या कुस्तीच्या पाहिल्याचा झटक्यात योगेश मुंडकरने प्रतिस्पर्धी संदीप पाटील यांना चित्थ करुन योगेश मुंडकरने अव्वल नंबरचा मान मिळऊन कुस्तीचा फड जिंकला.

तर दुस-या नंबरची ५००१ रुपयाच्या कुस्ती बोरगडी आणि नांदेड येथील पैलवान यांच्या तुल्यबळ लढतीत झाली. यात दुसऱ्या क्रमांकाची मनाची कुस्ती निलेश पैलवान बोरगडीकर यांनी जिंकली. त्याचबरोबर कुस्त्यांच्या आखाड्यात १००१ रुपयाच्या १० कुस्त्या, तसेच वैयक्तीक कुश्ती शौकीनांनी लावलेल्या १००० व ५००, २०००, ७०००, ५००० च्या अश्या मिळुन ५५ हजार रुपायाच्या कुस्त्या तळपत्या उन्हात यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव अनिल भोरे, मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या उपिस्थतीत पार पडल्या.

यामध्ये एका मुलीने देखील कुस्तीच्या फडात सहभाग घेऊन हम.. भी किसी से कम नही.. असे दाखऊन दिले आहे. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी आणि काखेळण्यासाठी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ राज्यातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्यातील हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड, हिंगोली सह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर झालेल्या कुस्त्यामुळे प्रेक्षकांनी तौबा गर्दी केली होती. प्रथम मनाची कुस्ती पटकावीणा-या योगेश मुंडकर या पैलवानास वर उचलुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तसेच बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त मिरवणुक काढली.

मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, माधव पाळजकर, संजय माने, अनिल मादसवार, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, खुदुस मौलाना, ज्ञानेश्वर शिंदे, अन्वर खान, बाबुराव बोड्डेवार, रामभाऊ ठाकरे, आश्रफ भाई, विठ्ठल ठाकरे, रामराव सूर्यवंशी, सुभाष दारवंडे, फेरोज खान पठाण, उदय देशपांडे, रामभाऊ सूर्यवंशी, सरदार खान, रामू नरवाडे, राजु गाजेवार, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, अशोक अंगुलवार, सय्यद मनानं भाई, अनिल नाईक, आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पैलवानास बक्षीस प्रदान करण्यात आले. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, जमादार अशोक सिंगणवाड यांनी स्वतः उपस्थित होऊन अन्य पोलिस कर्मचाऱ्यांसोबत कडक बंदोबस्त लावला होता. यामुळे आजचा हा महत्वाचा कुस्तीचा फड खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडला. 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!