
हिमायतनगर/भोकर। ऑगस्ट 2015 मराठा आरक्षण अनुषंगाने सोनारी फाटा येथे आंदोलनात बस फोडलेल्या आरोपात आज दि.04/03/2023 रोजी माननीय जिल्हा सत्र न्यायालय भोकर यांनी तिन्ही मराठा समाजाच्या युवा बांधवांना म्हणजे जांबुवंत निराशे कार्लेकर, गजनान वानखेडे वटफळीकर, रामभाऊ सुर्यवंशी यांना निर्दोष मुक्त केल्याबद्दल शिवसेनेचे भोकर तालुकाध्यक्ष माधव पाटील जाधव वडगावकर यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे. या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यासाठी नि:शुल्क सातत्याने बाजू मांडणारे विधीतज्ञ अँड अतुल वानखेडे सरसमकर, अँड पेदे साहेब, अँड जगदीश जाधव नंदगावकर, अँड रघुनाथ जाधव नंदगावकर यांचे आभार मानले आहेत. मराठा आरक्षणातील मर्द मराठ्यांना अखेर आठ वर्षानंतर न्याय मिळाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

मागील अनेक वर्षापासून सतत शासन दरबारी मराठा आरक्षणासाठी घडणार्या विविध आंदोलनकर्ते यांचेवर गुन्हे दाखल झाले असून, त्यातील काही गुन्हे शासनाने मागे घेतले असले तरी गंभीर गुन्हण्यामध्ये असलेले हिमायतनगर येथील लढवय्ये मराठी म्हणून ओळख असलेले रामभाऊ सूर्यवंशी, जांबुवंत मिराशे, गजानन वानखेडे यांच्यावरील गुन्हे शासनाने नवीन नियमानुसार मागे घेतले नव्हते. त्यामुळे सतत आठ वर्षापासून न्यायालयात चक्रा मारून समाजाला आरक्षण मिळावे हाच हेतु डोळ्यासमोर ठेवून विविध आंदोलने केली. होती. या तरुणांनी वेळप्रसंगी जेलची हवा ही खाल्ली. समाजातील विधीतज्ञ एडवोकेट अतुल वानखेडे, रघुनाथ जाधव, जेजे जाधव त्याच्यासह इतर वकील बांधवांच्या सहकार्याने आम्ही आज भोकर सत्र जिल्हा न्यायालयातून निर्दोष मुक्त झालो आहोत. अशी भावना या तरुणांनी व्यक्त केली. यामध्ये सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. माननीय न्यायमूर्ती यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सतत आठ वर्षापासून न्यायालयात खेटे मारणारे मर्द मराठे जामवंत मिरासे, रामभाऊ सूर्यवंशी, गजानन वानखेडे यांचे आज जिल्हा सत्र न्यायालय भोकर यांनी निर्दोष मुक्तता केली. त्याबद्दल शिवसेना भोकरचे तालुकाध्यक्ष माधव पाटील जाधव वडगावकर यांनी त्यांचा व एडवोकेट अतुल वानखेडे यांचा हार घालून सत्कार केला यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

मराठा आरक्षणासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याचे कळताच भोकर शिवसेना तालुकाज्ञ जाधव वडगावकर यांनी फटाक्याची आतिषबाजी करत शाल श्रीफळ देऊन सर्वांचा एकत्र सत्कार केला. या प्रसंगी बोलताना माधव जाधव वडगावकर म्हणाले की, कोणी कोणीही पक्षात असो समाजाचे का..? म्हटले तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे काळाची गरज असून, त्यातूनच आपल्यासारख्या नवतरुणांना ऊर्जा निर्माण होईल. राहिला विषय आरक्षणाचा यासाठी आपले समाज बांधव वारंवार शासन दरबारी पाठपुराव करित आहेत. आज जो जिल्हा सत्र न्यायालय भोकर यांनी आमच्या तीन सहकारी बांधवांना या गुन्ह्यातून मुक्त केले. या कामे समाज बांधव म्हणून एडवोकेट अतुल वानखेडे सरसमकर यांनी विनामूल्य केस लढवली त्याबद्दल त्यांचेही एक समाजाचे देणे म्हणून येथे सत्कार करण्यात आला.
