
नवीन नांदेड। अखंड हरिनाम सप्ताह मौजे विष्णुपूरी ता.जि. नांदेड.संगीत तुलसी रामायण कथा दि०३मार्च शुक्रवार ते दि. ०८मार्च गुरुवार वेळ दुपारी १२ ते ४ कथा सांगता दि. ०९मार्च शुक्रवार, पर्यंत विष्णुपूरी येथील श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिर दुर्गवाडा, येथे कथा प्रवक्ता ह.भ.प. रामायणाचार्य बालाजी महाराज गुडेवार नांदेड हे समधुर वाणीतून आयोजित केली आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज बिजोत्सव व धारूमाता मंदिर वर्धापनदिन सोहळा निमित्ताने ३ ते १० मार्च पर्यंत वै. हभप मामासाहेब मारतळेकर, वै. काळबा महाराज हरळबळकर, वै. माणिक महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने व हभप राजेजी महाराज हनुमान मंदिर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, गाथा पारायण व संगीत तुलशी रामायण कथा, ज्ञानयज्ञ सोहळा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन सप्ताह मध्ये पहाटे काकडा आरती, गाथा पारायण, गाथा भजन, दुपारी सायंकाळी हरिपाठ, रात्री बारा किर्तन आयोजित करण्यात आली आहे.संगीत तुलसी रामायण कथा हभप बालाजी महाराज गुडेवार यांच्या समधुर वाणीतून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आयोजित केले आहे.

या सप्ताह मध्ये हभप शिवशंकर महाराज डेरलेकर, ज्ञानोबा महाराज मुडेकर, अशोक महाराज ईदगे आळंदीकर, चंद्रकांत महाराज, लाठीकर, माधव महाराज कंधारकर,सोपान महाराज आहेरवाडीकर, बंडुदेव महाराज ईटोलीकर, यांचे तर काल्याचे किर्तन वैजनाथ महाराज कागदे उमरीकर याचे १० मार्च सकाळी ९ वाजता व ९ मार्च रोजी संगीत तुलसी कथा सांगता, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बिजोत्सव निमित्ताने सकाळी १० वाजता गुलालाचे किर्तन व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे, ४ मार्च रोजी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी भेट देऊन कथाकार गुडेगवार महाराज यांच्या सत्कार करून विठ्ठल रुक्मिणी मुर्ती भेट दिली,या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, मौजे विष्णुपूरी ता. जि. नांदेड यांनी केले आहे..

