
नांदेड। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरालगत असलेल्या वाडी भागातील जागृत हनुमान नगरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात ८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात शुगर, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र स्त्री रोग तज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ डॉ. अरूण महाले, डॉ. रमा स्वप्नील कदम व प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. महेश तळेगावकर महिलांची तपासणी करणार आहेत.
आहार नियोजनाचा अभाव व इतर कारणांमुळे स्त्रियांमध्ये अनेमिया अर्थात रक्ताचा क्षय हा आजार जडतो त्यामुळे अशक्तपणा, निश्तेज त्वचा, धाप लागणे , थोड्या कामाने थकवा येणे इत्यादी लक्षणे दिसतात.

हिमोग्लोबिन कमी झाल्याने हा आजार जडतो. यासाठी आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी आवश्यक ठरते. त्याच बरोबर मधुमेह हा आजार देखील असंतुलित आहार , दिनचर्या व वयोमानानुसार होतो. ही बाब लक्षात घेऊन जागृत हनुमान नगर वाडी रोड नांदेड येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मोफत हिमोग्लोबिन, शुगर व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.

याचा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक पत्रकार डॉ. दिलीप शिंदे, मुरलीधर शिंदे, हुलाजी हुलकाने, सुर्यकांत हुलकाने, हनुमंतराव पाटील, साहेबराव पांचाळ, सिध्देश्वर मठपती, मारोती ढगे, आदींनी केले आहे.

