Sunday, April 2, 2023
Home खास न्यूज घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्रासाठीची निधी तरतूद प्रशासकीय कचाट्यात -NNL

घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्रासाठीची निधी तरतूद प्रशासकीय कचाट्यात -NNL

श्री.खंडोबा मंदिर परिसरातच येत्या ९ मार्चला आमरण उपोषण;सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मा. भवरे यांचा निर्धार

by nandednewslive
0 comment

नायगांव बा./नांदेड। घुंगराळा-तलबिड निसर्ग पर्यटन केंद्राचा विकास  आराखडा सातत्याने त्रुटींच्या नावाखाली परत येत आहे वन विभागाच्या उदासिन धोरणामूळेच तो प्रशासकीय कचाट्यात अडकल्याने तो परिपूर्ण व योग्यतेने बनवूनच मान्यता घ्यावी आणि महाराष्ट्र विधानमंडळाच्या सद्यास्थित चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच यासाठीची निधी तरतूद व उपलब्धता करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे,वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार व पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्यासह संबंधित विभागाकडे पत्रकार लक्ष्मणराव मा.भवरे यांनी केली असून या प्रकरणात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. खंडोबा मंदिर घुंगराळा परिसरातच येत्या ९ मार्चला आमरण उपोषणास बसणार असल्याचा निर्धार केला आहे.

अधिक माहिती अशी की, जागृत देवस्थान श्री.खंडोबा (श्री.म्हाळसाकांत) मंदिर घुंगराळा व श्री.महादेव मंदिर गंगणबिड (तलबिड) येथिल तिर्थस्थळ व तिर्थक्षेत्र मंजूरीसह येथे विविध विकासकामांसाठी सोबतच,या दोन्ही मंदिर परिसरात गर्द वनराई असलेली वन विभागाची अंदाजीत तब्बल १५१ हेक्टर जमिन एकत्रित संपादन करुनच मंदिर परिसरातील विकास (सभामंडप व सुशोभीकरण,मूलभूत गरजांची विविध कामे आदी) वृक्षलागवड,वन्नोषधी उद्यान, वनक्षेत्र तटबंदी,अंतर्गत रस्ते, कृषी तंत्रज्ञान अभ्यासिका तसेच, जलसिंचनासाठी माती- सिमेंटची साखळी,बांध-बंधारे, पाणी साठ्यासाठी व पशू- पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी तलाव,समतल सलग चर व त्यावर रोपवन त्याचबरोबर, पर्यटक वाढीदृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविंधासह येथिल माळरानात अस्तित्वात असलेल्या सर्वच तलावातील गाळ उपसून त्यांची दुरुस्ती व त्यात बोटी असे एक ना अनेक मूलभूत गरजांचीही कामे घेण्यात यावीत.

ज्यामूळे येथिल वनजमिनींचा सर्वांगीण विकास होईलच व नवउद्योगातही वाढ होऊन या परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम मिळेल यासाठी येथे वन/ निसर्ग पर्यटन व्हावे म्हणून सन् २०११ पासून वन विभागासह प्रशासन,लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय राजकीय पुढारी यांच्याकडे लक्ष्मण भवरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरुच असून राज्याचे तत्कालीन व विद्यमान वनमंत्री ना.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशांनुसार याबाबतच्या मान्यतेचा प्रस्ताव मागवून महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या दिनांक २८ जुलै २०१७ रोजीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घुंगराळा- तलबिड निसर्ग पर्यटन केंद्राला मान्यता देण्यात येऊन प्रकल्प आराखड्यानुसार नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यांत आलेले होते. त्यामूळेच स्थानिक वनविभागाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता मात्र त्यात त्रुटी काढण्यात आल्यानंतर पूनश्च पूर्ततेसह तो पाठविण्यात आला होता.

परंतू,अनेकदा सदरचा प्रस्ताव त्रुटीच्या ‘गोंडस’ नावाखाली परत करण्यात आला असला तरिही परिपूर्ण व योग्यतेने बनवून घेण्यात आला नसल्यानेच आजपर्यंत यासाठी निधीची तरतूद व उपलब्धता झालीच नसल्याची खंत व्यक्त करुन त्यासाठी आपणच स्वतः लक्ष द्यावे अशी मागणी राज्याचे वनमंत्री ना.मुनगंटीवार यांना अनेकदा प्रत्यक्ष भेटूनच केली होती. सोबतच,त्यांच्या व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांच्या गतवर्षी नोव्हेंबर महिण्यातील नांदेड दौर्‍यात भाजपा नेते बालाजी बच्चेवार व लक्ष्मणराव मा.भवरे यांनी याबाबत प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती.त्यांच्या निर्देशांनुसार स्थानिक वनविभागाने वरिष्ठांना याबाबतीत विकास आराखडा पाठविला मात्र यावेळीही त्यात त्रुटी नोंदवून तो परत पाठविण्यात आल्याने सदर प्रकरणात परिपूर्ण विकास आराखडा बनवून त्याच्या मान्यतेसह महाराष्ट्र विधानमंडळाच्या सद्यास्थित चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच निधीची तरतूद व उपलब्धता व्हावी. अशी मागणी करुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री.खंडोबा (श्री.म्हाळसाकांत) मंदिर, घुंगराळा परिसरातच येत्या दिनांक ९ मार्चपासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी व मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे यांनी निवेदनाद्वारे दिला असून या निवेदनाच्या प्रति संबंधित विभागासह जिल्हा व तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची अशीही भूमिका ! विशेष बाब म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच, वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक व तत्कालीन सहसचिव सुजय दोढल,त.सहा. वनसंरक्षक डि.एस.पवार व देगलूरचे त.वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी प्रत्यक्ष स्थळ पहाणी,बैठकांतून विकास आराखडा बनविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतांनाच वन जमिनीचे संवर्धनासह, पर्यटन व नव उद्योग वाढीसाठी अभ्यासपूर्ण आणि सामाजिक दायित्व म्हणून केलेल्या मागणीसाठी लक्ष्मण भवरे यांचे कौतुक केले होते.मात्र तत्कालीन उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात सदर रखडलेल्या बाबींच्या पूर्णत्वास कर्तव्यतत्परता दाखविणे दूरच परंतू,भवरे यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या मागणीला तक्रार ठरवून वरिष्ठ व शासनाची दिशाभूल करीत स्वतःची अकार्यक्षमता लपविल्याने त्यांचेवरही कायदेशीर कारवाई व्हावी अशी भवरे यांची मागणी आहे.

नायगांव तालुक्यातील जनता एकवटली ..! दरम्यान सदरच्या दोन्ही मंदिर परिसरातील वन/ निसर्ग पर्यटनाचा विकास या प्रशासकीय यंत्रणेच्या कचाट्यात अडकल्याने येत्या ९ मार्चच्या नियोजित आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घुंगराळा- तलबिड परिसरातूनच नव्हे तर, संबंध नायगांव तालुक्यातील भाविक भक्त,जनता एकवटली असून विशेषतः लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी यामध्ये सहभागी होणे अत्यावश्यक असल्याचा सूर ऐकावयास मिळतो आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!