
नांदेड। विमानतळ हद्दीत ऐका 23 वर्षीय इसमाने घराच्या शेजारी असलेल्या 5 वर्षीय अल्पवयीन मुलीला आज दुपारी ,काही तरी देण्याच्या निमित्ताने लैंगिक छळ करुन तिला इजा करून जखमी केले.

ही घटना आई वडिलांनी तात्काळ पोलिसांना कळविले तात्काळ पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे आपल्या टीम सोबत दाखल होऊन आरोपी माधव रमेश जानोळे रा. रा.विमातळ परिसर नांदेड यास ताब्यात घेतले. आणि चिमुकलीस शासकीय रुग्णलयात दाखल केले, तिच्यावर उपचार चालू असून तिची तबियत स्थिर आहे. आरोपीचा देखील मेडिकल करण्यात आला असून आता आरोपी विरोधात 376,सह पोस्को आणि इतर कलमन्वे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

