
नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड, भावसार सेना सेवा समिती नांदेड व युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नविन नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिनांक 06 फेब्रुवारी 23 सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता ज्ञानेश्वर नगर ,हडको, नवीन नांदेड येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून, केरकचरा जमा करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक व मान्यवरांच्यी मोठया संख्येने उपस्थिती होती.

होळीच्या सणाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक होळी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हडको भागातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील मुख्य रस्ता लगत असलेल्या झाडे यांच्या पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पडत असल्याने परिसराची स्वच्छता करून अभियान राबविण्यात आले यावेळी भावसार समाज व पदाधिकारी मोठया प्रमाणात सहभागी होऊन परिसर स्वच्छ केला, व संकलन करण्यात आला, सायंकाळी विधीवत पुजन करून मान्यवराच्या उपस्थितीत होळी दहन करण्यात आले.

पर्यावरण होळीचे आयोजन विनोद सुत्रावे ,अध्यक्ष, भावसार समाज सिडको, रामदास पेंडकर तानुरकर, अध्यक्ष भावसार सेना सेवा समिती नांदेड,संजय पेठकर ,अध्यक्ष युनायटेड भावसार ऑर्गनायजेशन नांदेड,यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते, यावेळी जनार्दन ठाकूर, अभिजात ताकभिडे, किरण सुर्यवंशी, सुरज गायकवाड, अविनाश मस्के, खोबाजी पांचाळ, मांगुसिंग शेखावत, आंनद पेठकर, आनंदराव शिंदे, सतिश सुत्रावे, व्यंकटेश पांचाळ, सुरेश माळवतकर, यांच्या सह नागरीक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण पूरक होळी झाडे पाले कचरा संकलन करून मुळे परिसर स्वच्छ करण्यात आले.

