नांदेड। पुणे येथे दि 24 ते 26 मार्च दरम्यान तळेगाव पुणे येथे ही स्पर्धा मारवाडी आय एच ओ ए वर्ष सातवे या स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते यात नांदेड चा नंदकिशोर अडकटलवार यांचा मारवाड जातीचा बघिरा अश्व याने अदंत स्पर्धेत आठवा क्रमांक प्राप्त केला याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेत एकूण महाराष्ट्रातून 200अश्व यांनी सहभाग नोंदविला यात हॉटेल मंजू पेलेसचें अभिषेक यांनी हा अश्व घेऊन केलेल्या सादरीकरणात या मारवाड जातीचा अदंत अश्व बघिरा वय 22 महिने याला या स्पर्धेत आठवा क्रमांक मिळाला असून, भविष्यात बघिरा हा नावलौकीक मिळविण् असे अश्व प्रेमी सांगत आहेत. हा अश्व नांदेड चा असल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होऊन याला पाहण्यासाठी मुलांची गर्दी होत आहे.