
नांदेड| नांदेड ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरून येणारे व जाणारे वाहनांना आडवुन वाहनातील लोकांना व मोटार सायकल वरील लोकांना आडवुन लोकांकडुन पैसे, मोबाईल लुटण्याचे इराद्याने दरोडयाचे तयारीत असतांना सोनखेड पोलीसांनी ०५ गुन्हेगारांना गजाआड केले आहे.

दि. ०४ मार्च रोजी पोलीस स्टेशन सोनखेड येथे रात्रगस्त करीता नेमण्यात आलेले पोलीस अमंलदार पोहेकॉ/मधुकर मोरे पोलीस जीप चालक पोकॉ/नागरगोजे व होमगार्ड सुनिल मोरे असे पोलीस जीप मध्ये रात्रगस्त करीत असतांना राष्ट्रीय महामार्गावर वाहन धारकांना लुटण्याचे घातक हत्यारनिशी दबा धरून बसलेले असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिक्षक नांदेड श्रीकृष्ण कोकाटे व उप विभागीय पोलीस अधिकारी उप विभाग इतवारा नांदेड यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन सोनखेड येथील प्रभारी अधिकारी विशाल भोसले व वरील स्टॉफने शिताफीने दबा धरून बसलेल्या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी सोनखेड ते नांदेड रोडवर निसर्ग धाब्याच्या पाठीमागे दि. ०४ मार्च रोजी ०३.०५ वाजता 1) यश राजुसिंह कौशिक वय 19 वर्षे व्यवसाय ऍटोचालक राहणार ग्रामिण पॉलीटेक्नीकल कॉलेजचे पाठीमागे विष्णुपुरी नांदेड 2) रोशन गोपाळ पदमवार वय 19 वर्षे व्यवसाय मिस्त्रीकाम राहणार सगरोळी ता.बिलोली ह.मु.विष्णुपुरी काळेश्वर कमानीजवळ नांदेड 3) रोहीत विजयकुमार कदम रा.जि.प.शाळेच्या पाठीमागे नांदेड 4) संतोष किशन कंधारे रा.नवी अबादी जि.प.शाळेच्या अलिकडे विष्णुपुरी नांदेड 5) रोहीत कदम याचा मित्र नाव गांव माहित नाही याना गजाआड केले.

हे सर्व जण नांदेड ते लोहा राष्ट्रीय महामार्गावरून येणारे व जाणारे वाहनांना आडवुन वाहनातील लोकांना व मोटार सायकल वरील लोकांना आडवुन लोकांकडुन पैसे, मोबाईल लुटण्याचे इराद्याने दरोडयाचे तयारीत असतांना त्यांचे ताब्यात घटनास्थळी येण्या जाण्यासाठी वापरण्यात आलेला ऍटो व घातक शस्त्र तलवार व लोखंडी रॉड, दोरी अशा मुद्देमालासह दरोडा घालण्याचे तयारीत दबा धरून बसलेले मिळुन आले. यावरून पोलीस स्टेशन सोनखेड येथे कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोउपनि/सी.आर.परिहार हे करित आहेत.

