
नांदेड| केंद्रातील भाजपा सरकारने घरगुती वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढविल्या आहेत. तसेच तब्बल 50 रूपयांची गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केल्यामुळे या महागाईच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे दि.4 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर आदिंच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले. तसेच चुलीवर स्वयंपाक करून केंद्रातील भाजपा सरकारचा घोषणेबाजी देवून भाववाढीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले.

केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढविल्या आहेत. या दरवाढीच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड जिल्हाध्यक्षा प्रांजलीताई रावणगावकर यांच्या पुढाकारातून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, महिला जिल्हाध्यक्षा इंजि.प्रांजली सुभाष रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस डॉ.विक्रम देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष गजानन पांपटवार, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, युवकचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी शिक्षण संस्थाचालक जिल्हाध्यक्ष रंगनाथ वाघ, साहित्यीक नारायण शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापुरकर,

महिला जिल्हा उपाध्यक्षा मीना पेठवडजकर, महिला उमरी तालुका अध्यक्षा अश्विनी सावंत, मुदखेड शहर अध्यक्ष गंगासागर खंदारे, लोहा शहर अध्यक्षा संध्याताई जांभळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिगांबरराव गवळे, युवक काँग्रेसचे आत्माराम कपाटे पाटील, बालाजी बोकारे, कपिल भोजने, सुनिल धुमाळ, कामंद पाटील, जितेंद्र काळे, माधव कदम, गजानन जोगदंड, युवती काँग्रेसच्या अंजली भालेराव, दिपमाला खंदारे, नारायण शिंदे, जेष्ठ साहित्यीक डॉ.उत्तमराव सोनकांबळे, राष्ट्रवादीचे प्रकाश मांजरमकर, गगनदिपसिंघ जहागिरदार यांच्यासह आदी जणांची मोठ्या संख्येने या आंदोलनाच्या वेळी उपस्थिती होती.

गॅसच्या किंमती वाढल्याने सरकार पडणार -भोसीकर
पंतप्रधान मनमोहनसिंघ यांच्या कार्यकाळामध्ये गॅस सिलेंडर 450 रूपयाला होता परंतू आता 1 हजार 250 रूपयाला गॅस सिलेंडरची किंमत झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी उज्वला गॅस योजना गरिबांसाठी काढली परंतू ही योजना फसवी असून आता गॅस सिलेंडर न परवडणारे झाले आहे. भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढली आहे. गरीबांचे जिवन जगने मुश्किल झाले आहे. गॅसच्या किंमती कमी कराव्यात नाहीतर पुढील काळात गॅस सिलेंडरच्या किंमतीमुळे सरकार पडणार आहे असेही राष्ट्रवादी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

महिलांचे नियोजन बिघडले -प्रांजली रावणगावकर
महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा विद्याताई चव्हाण, मराठवाडा अध्यक्षा वैशालीताई गाडे व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आंदोलन केले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने गॅस सिलेंडरचे प्रचंड भाव वाढ केले त्यामुळे महिलांचे घरगुती खर्चाचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. मागिल आठ वर्षापासून सरकार विविध बाबींच्या किंमती वाढवित आहे. सर्वसामान्यांनी जगावे कसे हा प्रश्न पडला आहे. गॅसच्या किंमती कमी करून महिलांना सरकारने दिलासा द्यावा, भाववाढीचा आम्ही निषेध करतो असेही यावेळी मनोगत व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांनी सांगितले.

