
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील मौजे भूकमारी येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण काढून ग्रामपंचायत मालकीचे संरक्षण करा व ग्रामसेवक आणि सरपंच यांची नियमानुसार चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ विश्वाभंर पवार ,.जयश्री राजरत्न पवार , यांनी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार यांच्या कडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

सदरील निवेदनात म्हटले आहे की , कंधार तालुक्यातील मौजे भूकमारी येथील ग्रामपंचायत च्या हद्दीत अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे. ज्यावर फक्त ग्रामपंचायतींचे मालकी हक्क आहे .ग्रामपंचायत च्या मालकीच्या जागेचे जतन व संरक्षण करणे ग्रामपंचायत कार्यालयाचे अर्थात ग्राम विकास अधिकारी, सरपंच ,उपसरपंच, आणि सर्व सदस्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. गावठाणातील प्रवेश टेकाळे यांचे घर पश्चिमेस रस्ता , उत्तरेस नरोबा मंदिर व रस्ता , दक्षिणेस प्रल्हाद वाडेकर यांची जागा आहे.

या चतु : सिमेजवळ आतील मोकळी जागा ६० बाय ६० फूट ग्रामपंचायतच्या मालकीची आहे. सदर जागा यापूर्वी कोणाच्याही नवीन नमुना नंबर ८ (आठ) ला नोंद झालेली नाही. असे असताना सदर जागेवर सरपंच शिवकांतबाई माधवराव अंदुरे यांचे नातेवाईक नागोराव शंकर अडकिने यांनी अतिक्रमण केले आहे. ही बाब ही कायदेशीर आहे.मागील काही महिन्यापासून सदर जागा नमुना नंबर आठ ला नोंदविण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज देण्यात आला आहे. अर्जासोबत कसलाही हस्तांतर अथवा मालकी बाबतचा पुरावा जोडलेला नाही.

असे असताना सदर जागेची कोणाच्या नावाने बेकायदेशीर नोंद केली जाऊ शकत नाही. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची जागा नमुना नंबर ८ प्रमाणे ४३ फूट बाय ६६ फुट नोंदवली आहे. असे असताना ग्रामपंचायत जागेच्या शेजारी असणाऱ्या बालाजी किशन दलाले आणि सखाराम किशन दलाली यांनी अतिक्रमण करून सदर जागेवर कच्चे व पक्के बांधकाम केलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असताना दीर्घकाळ ग्रामपंचायत वर कब्जा असलेल्या विद्यमान सरपंच शिवकांताबाई माधवराव अंदुरे यांच्या संमतीने त्यांच्या नातेवाकांनी ग्रामपंचायतची जागा बळकावली आहे.नागोराव अडकिने यांनी ग्रामपंचायतीकडे नमुना नंबर ८ ला नोंदविण्यासाठी वारंवार दबाव तंत्राचा वापर केलेला आहे. या कृतीस सरपंच , ग्रामसेवक यांची मुकसंमती असल्याचे दिसून येते. सदर जागा खाजगी व्यक्तीच्या नावे लावण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ग्रामपंचायत कर्मचारी अथवा पदाधिकारी यांचे कायदेशीर कर्तव्य आहे.जर हे अधिकारी व पदाधिकारी मिळून ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे नुकसान करत असतील तर ते कृत्य ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन करणारे आहे.त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी ., तसे या बेकायदेशीर कृत्यात त्यांचा सहभाग सरपंच , यांच्या कडून ग्रामपंचायतीच्या जागेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्या प्रकरणी योग्य ती चौकशी करून विद्यमान सरपंच यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कंधार यांना ग्रामपंचायत सदस्य सिध्दार्थ विश्वाभंर पवार ,जयश्री राजरत्न पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.

