
हदगाव, गजानन जिदेवार। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पंचायत समिती हदगावच्या वतीने श्रीमती. त्रिवेणी धोंडीबा झाडे सहशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांना ” गौरव नारी शक्तीचा ” हा गौरव नुकताच प्रदान करण्यात आला आहे .

बालकांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास, माता पालक प्रबोधन ,लोकसहभाग ,त्याबरोबरच आजादी का अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव व सन्मान करण्यात आला आहे. शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वीही श्रीमती. झाडे यांना तालुकास्तरीय, राज्यस्तरीय ,राष्ट्रीय स्तरावर अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे .

प्राचीन काळापासून आतापर्यंत सर्वांनीच स्त्रियांचे अनन्यसाधारण महत्त्व मान्य केलेले आहे . कारण खरंच विद्वतेची दृष्टी तिच्याकडे असते . आपल्या कर्तृत्वाला ती जागृत असते. दुःखाचे अपार ओझे डोईवर असलं तरी हसत हसत ती सामोरी जाते परिस्थितीला . माता ,भगिनी ,पत्नी लेक, कितीतरी रूपातून ती सतत आनंद देत असते. तीच असते समईतील शांत वात व तीच असते जीवनाची मशाल.

कोणत्याही समाजाचा विकास होण्यासाठी त्या समाजातील लोक सुशिक्षित असणे महत्त्वाचे आहे. हा संस्कृत समाज निर्माण करण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावरती असते तो मुलांना शिक्षित करतो त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या तेजाने चमकण्यास शिकवतो जेणेकरून मुले क्षितिजावरून निघणाऱ्या लहान किरणा मधून प्रवास करून आकाशांच्या विमानात येऊन देशाचे नाव उंचवण्यासाठी सूर्यासारखे चमकणे शिकवतात.. या देशाची गौरवशाली परंपरा वहन करण्याची जबाबदारी सुद्धा शिक्षकांच्या खांद्यावरती असते . ती जबाबदारी स्वीकारत नवी पिढी घडवण्याचा वसा घेतलेल्या शिक्षिका ह्या गुरुस्थानी असतात..

आजची स्त्री ही स्वतःच्या विचारांच्या दांडा घेऊन स्वतःच्या कर्तुत्वाचा झेंडा रोवणारी, स्वतःच्या मनाचा तळ धुंडणारी, नशिबाचे भोग, वृत्तवैकल्याची जळमटे दूर करून आजूबाजूच्या परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण करणारी, इतिहासाचे मक्तेदारांना धडका देऊन ‘माझा इतिहास कोठे आहे ‘ हे विचारणारी, स्वतःच्या कार्यकर्तुत्वावर स्वतःचे पंख फडकावीत पाळण्याच्या दोरी प्रमाणे विश्वरथाचे देखील सार्थक करणारी ती खरी नारीशक्ती आणि आज अभिमानाने अगदी गर्वाने अशाच एका कर्तृत्ववान नारीशक्तीचा महिला दिनी सह हृदय शुभेच्छा देण्यासाठी हा सारा खटाटोप …

सामान्य कुटुंबात जन्म घेऊन असामान्य काम करणारी व्यक्ती ही सर्वांच्या डोळ्यासमोर चालना देत असतात. सर्वसामान्यपणे नोकरी आपलं घर आपले मूल हेच आपले सर्व असं न मानता त्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रिवेणी झाडे यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्या अतिशय तळमळीने काम करतात त्यांनी आजही हजारो विद्यार्थी समाजासाठी योगदान देणारे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी देखील घडवले आहेत. त्यासोबतच त्यांनी उत्कृष्ट शिक्षण क्षेत्रात मुलांना चांगले शिक्षण देण्याची काम त्यांनी प्रामाणिकपणे केलेले आहे.

अशा या नारीशक्तीचा जन्म नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माळ सावरगाव येथील एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव व इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण हदगाव येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव येथे झाले . त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण डीएड श्रीदत्त शासकीय अध्यापक विद्यालय हदगाव येथे झालेले आहे. तर उच्च शिक्षण नांदेड येथे झालेले आहे .
पुढील शिक्षण चालू असताना त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली त्यानंतर त्यांनी इसवी सन 2008 मध्ये प्रथम शिक्षिका म्हणून नियुक्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तलाईगुडा तालुका किनवट येथे त्या रुजू झाल्या .. काही काळानंतर त्या हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगाव येथे त्यांची बदली झाली व ते आजपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगाव येथे त्या कार्यरत आहेत त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…
