
उस्माननगर। जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा उस्माननगर ता. कंधार येथील शाळेतून तीन मुलींची तालुकास्तरीय अंतरिक्ष केद्र श्रीहरिकोटा उपग्रह प्रक्षेपण प्रत्यक्ष अनुभव इस्त्रो सहलसाठी संदर्भिय पत्रातील घटकांवर आधारित केद्रस्तरीय परीक्षेत घवघवीत यश मिळवून जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे .

या अगोदर घेण्यात आले आलेल्या केंद्रस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या कु. गायत्री रंगनाथ जाधव हीने सर्वात जास्त मार्क घेऊन तर अक्षरा राम मोरे ,आल्फिया आसिफ पठाण या तीन मुलींनी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. आता त्यांची निवड जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र झाल्या आहेत. यावेळी सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.ज्ञानेश्वर पाटील घोरबांड ( शा.व्य. समितीचे अध्यक्ष ) हे तर श्री.कनशेट्टै ( केंद्रप्रमुख शिराढोण जि.प. ) हे होते .

यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या बळवंतराव वांगे ,गौतम सोनकांबळे , पांडागळे आर. एस. , अनिरुद्ध सिरसाळकर ,पी.एन.सुर्यवंशी ,सौ. एम.एस. लोलगे , सौ.पि.एस. गाजूलवाड ,सौ. एम एन.देशमुख , एकनाथ केंद्रे , खान ,सौ. आशा डांगे , पाटोदेकर सूनंदा ,आलेवाड सुशिलाबाई , तर पालक रंगनाथ जाधव ,राम मोरे ,आसिफ पठाण ,केशव होळगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यीनीचे सत्कार करून पुढील परिक्षेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.

