नवीन नांदेड। महिला दिनानिमित्त सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सिडको येथील टिन शेड येथे जिल्ह्यातील एकमेव महिला वृत्तपत्र विक्रेता वंदना लोणे यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला, व मिठाई वाटप करण्यात आली.
महिला दिनाच्या निमित्ताने ७ मार्च रोजी सकाळी सिडको येथील वृतपत्र विक्रेता टिन शेड सेंटर येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे सचिव रमेश ठाकूर, लोकमत वितरणाचे संजय कुमार गायकवाड,सिडको परिसरातील जेष्ठ विक्रेते मदनसिंह चोहाण,शेख सयोधदीन, वृतपत्र विक्रेते संघटनेचे सिडको अध्यक्ष सतिश कदम, बालाजी सुताडे, राजु चव्हाण,तातेराव वाघमारे,अमोल नांदेड,शुभम गणेश ठाकूर,व वृतपत्र विक्रेते उपस्थित होते.