नांदेड। भारतातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना ग्लोबल सोशल इंटरेस्ट लीग या दिल्लीतील संस्थांच्या वतीने दरवर्षी 100 महिलांना नारी अस्तित्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यावर्षी नेकी की राह या थीमवर आधारित महिलांचं शोध लावण्यात आलं होतं ज्यांनी वेगळी राह निवडून समाजासाठी किंवा महिलांच्या हितासाठी वेगळं काही काम केलं असेल यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं.
एक वर्षाच्या कालखंडामध्ये महिला झाल्यापासून डॉ सान्वी जेठवाणी यांनी अनेक प्रश्न तृतीय पंथांसाठी मांडून समाज कल्याणाचा काम करण्याचा प्रयत्न करत समाजावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. म्हणून ह्या संस्था ने 100 प्रभावशाली भारतातील महिलांपैकी डॉ. सान्वी जेठवाणी यांना या पुरस्कारासाठी निवडलं.
सदरील पुरस्कार विविध मान्यवरांचा हस्ते दिल्ली येथे महिला दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात आलं. परंतु डॉ. जेठवाणी या दिल्लीत जाऊ नाही शकल्याने त्यांनी ऑनलाइन हा पुरस्कार स्वीकारला असून मान्यवरांनी त्यांचे कार्य बघून अभिनंदन केले आहे. आज पर्यंत मला अनेक पुरस्कार मिळाले असून हा पुरस्कार महत्त्वाचा ठरतो कारण महिला होऊन एक वर्ष झाल्या मध्ये अनेक उपलब्धी प्राप्त झाल्याने आज परिवर्तित महिला म्हणून देखील मला तेवढाच मान मिळत असल्याने या पुरस्काराची उंची वाढत आहे आणि मला मिळालेल्या सन्मान देखील या पुरस्कारामुळे वाढतोय म्हणून हा पुरस्कार माझ्यासाठी अति महत्त्वाचा असल्याचं सान्वी जेठवाणी यांनी प्रतिपादन केले. त्यांना या यशा बद्दल विविध संघटना व नांदेडकरांच्या वतीने त्यांचा अभिनंदन करण्यात आलं.