
नांदेड।शृंगारिक कविता आणि दिव्यार्थी विनोदांची रेलचेल असलेल्या ॲड.दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या २१ व्या महामुर्ख कविसंमेलनात देशभरातून आलेल्या कविंनी एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्यामुळे हजारो रसिकांनी होळीचा आनंद मनसोक्त लुटला.

होलिका उत्सव समिती, कलामंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारे होळीनिमित्त सतत २१व्या वर्षी गंधर्वनगरी, कलामंदिर नांदेड येथे महामूर्ख कविसंमेलनाचे आयोजन दिलीप ठाकूर यांच्यासह डॉ.जुगल धुत,गोवर्धन बियाणी,डाॅ.हंसराज वैद्य हे करतात. रसिकांनी खचाखच भरलेल्या मैदानात सुरुवातीला मूर्ख शिरोमणी म्हणून मान्यता पावलेल्या दोन गर्दभ राजाचे मर्चंन्ट बँकेचे अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि भाजपा शीख सेल जिल्हाध्यक्ष कृपालसिंघ हुजूरिया यांनी पुष्पहार घालून स्वागत केले.गुरुद्वारा बोर्ड सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांनी एका तृतीय पंथीयाला विशिष्ट प्रकारचा हार घातल्या मुळे हास्याचा स्फ़ोट झाला.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,जैन समाज मराठवाडा अध्यक्ष राजू जैन, प्रतिष्ठित व्यापारी अक्षय रावत,प्रसिद्ध उद्योजक अखिलेश गुप्ता,विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत,भाजप उद्योग आघाडी उपाध्यक्ष शिवप्रसाद राठी, नांदेड भूषण राजेंद्र हुरणे,प्रतिष्ठित व्यापारी शिवाजीराव इबितवार, प्रतिष्ठित व्यापारी नागेश शेट्टी, प्रतिष्ठित व्यापारी सतीश सुगनचंदजी शर्मा,सामाजिक कार्यकर्ते बिरबल यादव,प्रतिष्ठित व्यापारी सुमेर राजपुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाराणसी नंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कवि संमेलनाचे आयोजन करण्यात येते.आगळ्यावेगळ्या या कविसंमेलनात हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे यांच्या उडत्या चालीवर असलेल्या विडंबन गितांना रसिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.शाहीर रमेश गिरी यांच्या आगळ्या वेगळ्या पाळण्याने कविसंमेलनाची रंगत वाढवली.

आग्राच्या प्रा. ओमपाल निडर यांनी शृंगार गीते सादर केली. उत्तर प्रदेश च्या सफर जौनपुरी यांच्या हजर जबाबी पणाला रसिकांनी दाद दिली.प्रा.रविंद्र अंबेकर यांचे विनोदी किस्से ऐकून श्रोते मंत्रमुग्ध झाले.चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड यांनी सादर केलेल्या मिमिक्रीला टाळ्यांचा कडकडाट मिळाला.पत्रकार राजेंद्र शर्मा यांचे मार्मिक सादरीकरण रसिकांना भावले.सिनेस्टार लच्छु देशमुख यांनी सहअभिनय सादर केलेल्या विनोदामुळे उपस्थिताची चांगली करमणूक झाली.

राजेंद्र उपाध्याय,अविनाश मामीलवाड,पी. बिंदू नाईक, विलास जोगदंड यांनी देखील आपल्या रचनांनी रसिकांवर छाप पाडली. संयोजक दिलीप ठाकूर यांनी संचलन करतांना प्रत्येक अतिथी व कवी यांच्यावर केलेल्या विनोदी टिपणीचा हजारो श्रोत्यांनी वेळोवेळी मनमुराद टाळ्या वाजवून पसंती दर्शविली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे नाईलाजास्तव रात्री दहा वाजता कार्यक्रम बंद करण्यात आला तरी रसिकांचा वर्षभरातील हसण्याचा कोटा पूर्ण झाला.

मैदानाची जागा अपुरी पडल्यामुळे उशिरा आलेल्या रसिकांना चार तास उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला.नरेश निहलानी, राजू लालवानी, प्रदीप चालीकवार,जुगलकिशोर शुक्ला,वसीम बारी यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.मनपा तर्फे वसीम तडवी, स्वच्छता निरीक्षक बालाजी देसाई, सदाशिव खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानाची स्वच्छता करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महामूर्ख कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर,कामाजी सरोदे,अरुणकुमार काबरा,प्रशांत पळसकर,सुरेश लोट, राजेश यादव, महेंद्र शिंदे, प्रभुदास वाडेकर,आनंद गांधारी,अजयसिंह परमार, कुमार अभंगे, शेखर भावसार,धरमसिंह परदेशी, गौतम सावने,राहुल साउंडवाले यांनी परिश्रम घेतले.वर्षभर मनातील एका कोपऱ्यात साचलेल्या भावनांचा निचरा करण्यासाठी दिलीप ठाकूर हे गेल्या २१ वर्षापासून होळीचे अनोखे आयोजन करत असल्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
( छाया: करणसिंह बैस, सचिन डोंगळीकर, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, धनंजय कुलकर्णी )
