अर्धापूर। नांदेड-अर्धापूर महामार्गावरील ३६१ रस्त्यावर वाहनांचे अपघात नेहमी होतात,आता तर चक्क खडकूत पाटीजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला सोमवारी रात्री उशीरा रानडुकरांने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाले आहेत, पाठीमागून लवकर वाहन न आल्याने या जखमींचे प्राण वाचले आहेत,जखमीवर ऐन शिमग्यादिवशी उपचार घेण्याची वेळ आली आहे.
अर्धापूर तालुक्यात रानडुकरांने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान केले,तर पार्डी सह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले,आता तर चक्क महामार्गावरील रस्त्यावर रानडुकरांनी उद्रेक केला आहे,शिमग्याच्या दिवशी अर्धापूरहुन रात्री ९ च्या सुमारास दुचाकी क्र.एम एच २६ बी एल ३४५५ वरुन मोईन शेख महंमद वय (४०) व रसूलखान खौरऊल्ला खान वय (३६) दोघे रा.नवी आबादी नांदेड नांदेडकडे जात असतांना खडकूतपाटीजवळ अचानक रानडुकर रस्त्यावर आले.
दुचाकीस्वारांची या रानडुकराला जबर धडक बसल्याने या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले, यावेळी पाठीमागून वाहन न आल्याने दुचाकीस्वारांचे प्राण वाचले,जखमींना महामार्गाचे रमाकांत शिंदे शेणीकर,रविंद्र साकळकर,शेख एकबाल, कोकाटे मदतनिस वसंत शिनगारे, यांनी शासकीय रुग्णालय नांदेड येथे पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून दाखल केले,अशी माहिती महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांनी दिली आहे.