
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। अण्णाभाऊ पीपल्स फोर्स आयोजित नांदेड जिल्हा समाज जोडो प्रबोधन यात्रा 2023 चा समारोपाचा कार्यक्रम दि.11 मार्च,2023 रोजी दुपारी 1 वा.नायगाव बा येथील ब्लू बेल्स इंग्रजी माध्यम शाळा येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता हायस्कूल येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक मा रा. ना.मेटकर हे राहणार असून ज्यांच्या अथक परिश्रमातून आणि नेतृत्वाखाली ही प्रबोधन यात्रा दि.9 फेब्रूवारी,2023 रोजी कंधार तालूक्यातील क्रांतीकारी गाव गऊळ येथून प्रारंभ होऊन नांदेड जिल्हयातील सर्वच तालूक्यामध्ये व तालूक्यातील कांही प्रमूख गावामध्ये समाज जोडण्यासाठी त्यांनी 12 कलमामधून प्रबोधन यात्रेचे उद्देश स्पष्ट करीत सभा घेतलेले प्रमूख मा.बा.रा. वाघमारे यांचेही विशेष मार्गदर्शन होणार आहे.

या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक प्रा.डॉ. शंकर गड्डमवार व प्रमूख वक्ते प्रा.डॉ. प्रकाश हिवराळे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात लोकस्वराज्य आंदोलनाच्या कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पवार, सेवानिवृत पीएसआय शेषेराव रोडे, सेवानिवृत इंजिनिअर शंकर माळगे, प्राचार्य पंढरीनाथ कोतेवार, प्राचार्य आर.एम. सुर्यवंशी, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पंडितराव वाघमारे, मा.शंकरराव गायकवाड, लसाकमचे तालुकाध्यक्ष माधवराव सोन्जे व सचिव भीमराव बैलके, उतमराव गायकवाड, शाहीर माधव बैलकवाड यांची प्रमूख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती राहणार आहे.

सदर प्रबोधन यात्रा ही मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नांव द्यावे, सार्व. उद्योगाचे खाजगीकरण तात्काळ बंद करून नव्याने सर्व उद्योग निर्माण करावे, देशातील सर्वच निवडणूका फक्त बैलेट पेपरनेच घेण्यात याव्यात, हिंदू धर्मामध्ये असलेल्या सर्वच जातीमधुन मंदिरामध्ये पुजारी, विश्वस्त, प्रशासकीय कर्मचारी व शंकराचार्य याची निवड व्हावी, मंदिरातील जमा झालेल्या पैशाचा वापर शिक्षण व आरोग्यासाठी खर्च करण्यात यावा, गाव तिथे एक गांव एक स्मशानभूमी ती सर्वासाठी सार्वजनिक असावी, 2018 पासून अनु. जाती, जमाती व ओबीसीना डावलून केवळ मुठभर सवर्ण समाजाच्या व्यक्तीना लॅटरल पद्धतीने आयएएसचा दर्जा देऊन केंद्रिय सचिवालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून नेमण्याची पद्धत तात्काळ बंद करण्यात यावी यासह अनेक विषयावर प्रबोधन करून नायगाव येथे मोठया सभेमध्ये तिचा समारोप होणार आहे तरी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष सेवानिवृत पेशकार शंकर पवार यांनी केले आहे.

