
हदगांव, गजानन जिदेवार। पूर्वीच्या वादातुन स्वतःच्या मालकीची असलेली कार पेट्रोल टाकून पेटून देऊन आरोपी अद्यापही फरार असल्याची घटना तालुक्यातील वडगाव येथे दोन मार्च रोजी घडली विशेष बाब म्हणजे घटना घडून चार दिवस झाले तरीपण आरोपी अद्याप फरार आहे. फिर्यादी प्रभू विश्व्नाथ कांबळे यांच्या तक्रारीवरून तामसा पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विक्रम प्रकाश राहुलवार यांच्यावर ऑट्रॉसिटी सह जाळपोळचे गुन्हे तिन मार्च रोजी दाखल झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी प्रभू कांबळे हे आपले गावात किराणा दुकान चालवीतात व परिसरातील किराणा दुकानदारांना गोळी भांडार नेऊन देतात. हा व्यवसाय करत असताना गावातील गुडप्रवतीचा वर्तन असलेला माणूस विक्रम प्रकाश राहुलवार यांना देखावत नसल्याने दारू पिऊन वारंवार प्रभू कांबळे व त्यांच्या कुटूंबाला शिवीगाळ करून घर जाळण्याची व कार जाळण्याची भाषा करीत होता.

अनेक वेळा कांबळे यांनी त्यांना समजावून सागितले व गावातील प्रमुख व्यक्तीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु दिवसेंदिवस आरोपीचा द्वेष वाढतच होता. दोन मार्च रोजी प्रभू कांबळे यांची कार क्रमांक एम एच बारा डी वाय ९६३६ या नंबर ची कार नवी आबादी वडगाव येथे काका उत्तम गायकवाड यांच्या घरी लावली होती. यावर आरोपी विक्रम यांनी पाळत ठेऊन रात्री दोनच्या सुमारात पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणून बियरच्या बॉटल मध्ये टेंबा करून पेटून दिली.

यामध्ये प्रभू यांच्या कारीचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची फिर्याद प्रभू कांबळे यांनी तामसा पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विक्रम राहुलवार यांच्यावर ॲट्रॉसिटीसह इतर गुन्हे दाखल केले आहे. परंतु आरोपी अद्याप फरार आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शाफक्तता आमना मॅडम करीत आहेत.

