नवीन नांदेड। युवा गुप्र सिडकोच्यावतीने शिवजन्मोत्सवा निमित्य दि ११ मार्च रोजी ” चला हवा येऊ द्या !, काँमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातील हस्य कलाकरासह संगीत , नृत्य , पोवाडा यांची हस्य विनोदाची मनोरंजनात्मक मेजवाणीचे आयोजन करण्यात आल्याची माहीती युवा गुपचे संस्थापक अध्यक्ष तथा युवक काँग्रेस शहरचे जिल्हाउपाध्यक्ष सतिश पाटील बस्वदे यांनी दिली , या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे .
सिडको येथील युवा गुप्रच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्याने जिजाऊ सृष्टी सिडको मैदान येथे दि ११ मार्च रोजी सायकांळी ६ वाजता संगीत , नृत्य आणि हास्य विनोदाची मनोरंजनात्मक मेजवाणीचे आयोजन करण्यात आले आहे . या विनोदाच्या कार्यक्रमात ” चला हवा येऊ द्या ” आणि ” काँमेडीची बुलेट ट्रेन “यातील कलाकार अंकुश वाढवे , अशिष पवार , जयवंत भालेकर , स्नेहल शिदम , अंशुमन विचारे , कमलाकर सातपुते , नम्रता –, सतिश कासेवार ह्याचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे .
आयोजक तथा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश बस्वदे यांच्या मार्फत युवा गुप्रच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत “शिवाजी अंडरग्राऊंड ईन भिमनगर मोहल्ला” , प्रसिध्द शिवप्रबोधनकार नितीन बानगुडे पाटील,हभप बाळु महाराज गिरगावकर,विजय महाराज तनपुरे यांच्या पोवाडा, संभाजी भगत यांच्या शाहीरी जलसा,जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे व्याख्यान,तर महिलांसाठी होम मिनिस्टर ,हभप शिवलीला ताई पाटील, प्रसिध्द किर्तनकार निवृती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कडुबाई खरात यांच्या भिमगिताचा तर अण्णा भाऊ साठे जयंती सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते . त्यांनी सामाजिक उपक्रमात स्वच्छ व सुंदर सिडको कल्पनेतून कचरा पेट्या चे वाटप ,नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप,अन्नदान व शैक्षणिक क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला माजी आ.अमिताताई चव्हाण,माजी पालकमंत्री डि.पी.सावंत,आ.अमर राजुरकर, आ.मोहनराव हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महापौर जयश्री ताई पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, काँग्रेसचे पक्ष पक्षप्रवक्ते संतोष पांडागळे,जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील कोढेकर, विठ्ठल पावडे, नगरसेवक राजु पाटील काळे, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख,श्रीनिवास जाधव, सिध्दार्थ गायकवाड,संजय मोरे, माजी नगरसेविका संजय इंगेवाड, सौ. ललिता शिंदे बोकारे, सौ. करुणा जमदाडे, सौ.वैजयंती गायकवाड, वाघाळा शहर काँग्रेस कमिटीचे विनोद कांचनगिरे यांच्या सह आजी माजी लोकप्रतिनिधी व काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यी उपस्थिती राहणार आहे.
या हास्य विनोदाची मनोरंजनात्मक मेजवाणीला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी , महिलानी युवकांनी उपस्थित राहुन हास्य मनोरंजनातुन निखळ आनंद लुटावा असे आवाहन आयोजक सतिश पाटील बस्वदे यांनी केले आहे .