Sunday, April 2, 2023
Home हदगाव महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनताच भाजपाच ‘पोटशुळ उठल होत – खा .संजय जाधव -NNL

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनताच भाजपाच ‘पोटशुळ उठल होत – खा .संजय जाधव -NNL

by nandednewslive
0 comment

हदगाव, शे.चांदपाशा| शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच भाजपाच्या पोटात पोटशुळ उठल होत. भाजपाचे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे असा हल्ला परभणी लोकसभेचे (ठाकरे गटचे) खा. संजय (बंडू) जाधव यांनी केले.

ते रविवारी हदगाव शहरात शिवगर्जना अभियान मध्ये उपस्थित झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करतांना बोलत होते. यावेळी प्रस्ताविक नादेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख [ठाकरे गटाचे] माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलं. खा.सजय जाधव यांनी भाजपा व माध्यमवार जोरदार टिका केली. यावेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की, कश्मीर मध्ये महेबुबा मुफ्ती सोबत युती करताना तेव्हा कुठं गेल होत भाजपाच ‘हिंदुत्व’ शिवसेनेचे मा.उद्धव ठाकरे यांनी यांनी महाविकास आघाडी केली. तेव्हा हिदुत्व जाग झालं. तेव्हा माञ भाजपाने पहाटेच आजित पवार सोबत शपथ घेतली होती ‘तुमच तुटल आमच जुटल तुमच जुटल असत तर सर्वकाही राजा हरिशचंद्रा….सारख होत.

आमच म्हणजे कौरव सारख होत का ….? असा सवाल करुन ते माध्यावर ही चांगलेच घसरले होते. खा.जाधव माध्यमवर बोलतांना म्हणाले की, कालच मी शिवसेना कशी “हायजाँक “करण्यात आली होती हे सागण्याचा प्रयत्न करित आसतांना काही उत्साही मिडीयाच्या लोकांनी मला अस दाखवयला नको होतं. मी तिथे काय बोललो होतो याच सविस्तर वृतांत दाखवायला हवे होत. पण ते न दाखवता भलतच काही म्हणजे ‘आपल झाकून दुस-याच वाकून ‘असले धंदे माध्यमांनी करु नये असे अहवानही खा जाधव यांनी यावेळी केले. शिवगर्जना आभियानात शिवसेनेचे उपनेते नितिन बनगुडे पाटील, उपनेत्या ज्योति ठाकरे, संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी आ रोहीदास चव्हाण यांनी यावेळी शिवसैनिकांना संबोधित केले.

हदगाव विधानसक्षेञाचे शिवसेनाचे नादेंड जिल्हाप्रमुख माजी आ .नागेश पाटील आष्टीकर म्हणाले कि, ईश्वर कृपेने आज आमची तिसरी पिढी राजकाराणात आहे. मी जर ठरवलं तर पुणे सारख्या शहरात कारखाना टाकुन अलिशान जीवन जगु शकलो असतो असे ते आपल्या भाषणात म्हणाले होते. तोच धागा धरुन परभणीचे खा संजय जाधव यांनी त्यांना सागितले की, तुम्ही पुण्याला कारखाना न टाकता हदगाव तालुक्यात टाका व इथल्या बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दया.. यावेळी टाळ्यांचा गडगडाट झाला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!