नांदेड। जयप्रकाश ग्राम कल्याण संस्था नांदेड तर्फे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना प्रा. राम अय्यर यांच्या हस्ते ” दीन बंधू सेवा पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले असून, दिलीप ठाकूर यांचा हा ८० वा पुरस्कार असल्यामुळे त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
निर्धार नशा मुक्ती केंद्र सांगवी येथे झालेल्या सन्मानाच्या वेळी सुप्रसिद्ध विचारवंत तथा संस्थेचे अध्यक्ष प्रा. राम अय्यर यांच्या हस्ते दिलीप ठाकूर यांना स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पहार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नांदेड भूषण सरदार नवनिहालसिंघ जहागीरदार, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष
रणजितसिंघ कामठेकर,कोषाध्यक्ष सौ. रमास्वामी अय्यर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला अंबादास कानोले यांनी स्वागत गीत गायले.
याप्रसंगी राम अय्यर यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की, दिलीप ठाकूर यांच्या डोक्यातून समाजसेवेच्या असे काही अभिनव उपक्रम निघतात की, त्याची कोणी इतर कल्पना देखील करू शकत नाही. नुसती कल्पनाच न करता त्याची शंभर टक्के अंमलबजावणी दिलीप ठाकूर करतात. त्यांच्या अखंडित सेवेची दखल घेऊन त्यांची भाजपातर्फे विधान परिषदेवर निवड व्हावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
रणजितसिंघ कामठेकर यांनी बोलतांना असे सांगितले की, दिलीप ठाकूर यांच्या समाज कार्याला ३७ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे अशा कर्तुत्वान व्यक्तींचा शासन स्तरावर सन्मान होणे आवश्यक आहे. दिलीप ठाकूर यांच्यावर पक्ष विरहित प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत.नवनिहालसिंघ जहागीरदार यांनी आपल्या भाषणतून जगावेगळे ७८ उपक्रम राबविणाऱ्या दिलीप ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, तरुणपणात ज्यांना आदर्श मानायचो त्या राम अय्यर सरांकडून पुरस्कार मिळाल्यामुळे आणखी सेवा करण्याची उर्मी प्राप्त झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अर्जुन काळे यांनी तर आभार संस्थेचे सचिव सचेतन अय्यर यांनी मानले. कार्यक्रमाला नवज्योतसिंघ जहागीरदार,सौ सुषमा, अर्चना हटकर, श्रीकान्त निळेकर ,मंगल कांबळे ,संजीव रामगिरवार, नारायण काळे , विमल मसलकर,संकेत अय्यर, संजय कदम, राजु पाटिल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.काही दिवसापूर्वीच आरपीआय आठवले गटातर्फे ” सवेंदनशील कार्यकर्ता ” व लायन्स क्लब रिजन कॉन्फरन्स मध्ये योगेश जैस्वाल यांच्यातर्फे “लायन्स आप्रिशीयेशन अवॉर्ड ” मिळाल्यानंतर दिलीप ठाकूर यांच्या शिरोपेचात दीन बंधू सेवा पुरस्काराची वाढ झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.