
नांदेड।आर्थिक दुर्बल घटकासाठी इंग्रजी शाळांमध्ये 25% आरक्षणाकरिता ऑनलाइन प्रवेश फार्म मागविले जात आहेत परंतु वारंवार सर्वर डाऊन असल्यामुळे मुदतवाढ द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे महानगराध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांनी केली आहे.

नामांकित व प्रतिष्ठित इंग्रजी शाळांमधून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश व शिक्षण मिळावे याकरिता राज्य शासनातर्फे शिक्षण अधिकार कायद्यानुसार 2023 24 करिता 25 टक्के प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना रहिवासी पत्त्यापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेल्या इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते . अधिकृत वेबसाईटवर राज्यभरातून प्रचंड ताण येत आल्यामुळे सर्व वारंवार डाऊन होत आहे.

सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची 17 मार्चपर्यंत मुदत असून या कालावधीमध्ये अनेकांना इंटरनेट सर्वर डाऊनमुळे फॉर्म भरणे शक्य होणार नाही असे चित्र दिसत आहे. निर्धारित काळामध्ये प्रवेश फार्म भरू न शकल्यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ पासून वंचित राहावे लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेआर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची एक महिन्याची मुदतवाढ द्यावी अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महानगराध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी मार्फत प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.

